Breaking-news

उत्तर भारतात वादळाचा हाहाकार, 109 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : उत्तर भारतात जोरदार पाऊस, धुळीचे वादळ व जोरदार वारा यामुळे १०९ जणांचा बळी गेला असून, शेकडो लोक जखमी झाले. वादळी वारे व पावसाचा सर्वाधिक फटका उत्तर प्रदेश आणि राजस्थानला बसला आहे. उत्तराखंड, पंजाब, हरयाणा आणि मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडली आहेत व वीजपुरवठाही खंडित झाला आहे. वादळाचा तडाखा बसलेल्या राज्यांमध्ये तातडीने मदत व पुनर्वसनाचे काम सुरू करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. धुळीच्या वादळाचा सर्वांत जास्त तडाखा उत्तर प्रदेशला बसला. चार जिल्ह्यांत ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. या चार जिल्ह्यांत तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. या नैसर्गिक आपत्तीत मरण पावलेल्यांबद्दल राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button