Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
शेतकरी आंदोलनात पंजाबमधील शेतकऱ्याची आत्महत्या
नवी दिल्ली – केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी राजधानी दिल्लीत गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन करत आहेत. दरम्यान शनिवारी (9 जानेवारी) दिल्ली-हरियाणा सिंघू सीमेवर पंजाबमधील 40 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे.
मृत शेतकरी अमरिंदर सिंह हे मूळचे पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्ह्यातील रहिवासी होते. शनिवारी रात्री त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.





