Breaking-newsताज्या घडामोडी

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कोरोनाची लागण

नाशिक – राज्य सरकारमधील डझनभराहून अधिक मंत्री व विधानसभा अध्यक्षांनंतर आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून ते क्वारंटाइन झाले आहेत.

‘माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी, असं आवाहन झिरवाळ यांनी केलं आहे. ‘लवकरच करोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

झिरवाळ यांच्या मुंबई कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं त्यांचे कार्यालय आधीच बंद करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः आठ दिवस होम क्वारंटाइन राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. ‘मी कोणालाही भेटणार नाही. माझे कार्यालय व कामकाज सुरूच राहील,’ असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. कोणतीही अडचण असल्यास माझे स्वीय सहाय्यक धनराज भट्टड (९६८९३४५१४४) यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. आता त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना १४ दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button