क्रिती सेनॉनच्या ब्रेकअपच्या केवळ अफवाच! कथित बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो व्हायरल

Kriti Sanon | बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या तिच्या ‘कॉकटेल २’ चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आहे. या चित्रपटात तिने शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली असून, तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपटांशिवाय क्रिती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच लाईमलाईटमध्ये असते. गेल्या काही दिवसांपासून क्रिती आणि तिचा कथित बॉयफ्रेंड, बिझनेसमन कबीर बहिया यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र, आता क्रितीने एक खास फोटो शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या फोटोमुळे क्रिती आणि कबीर यांचे नाते संपलेले नसून ते अजूनही एकमेकांना डेट करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या क्रितीने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. वर्ष २०२६ मधील पहिले सहा महिने (अर्धे वर्ष) पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने गेल्या ६ महिन्यांतील काही न पाहिलेले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. या पोस्टमध्ये तिने सुट्ट्यांचे क्षण, कुटुंबासोबत घालवलेला वेळ, तिचे सेल्फी, आणि ‘कॉकटेल २’ च्या शूटिंगदरम्यान रश्मिका मंदानासोबतचे पडद्यामागचे काही खास क्षण शेअर केले आहेत.
या सर्व फोटोंमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबतच्या फोटोने. या फोटोनंतर चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा
आषाढीवारी तयारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडून पालखी मार्गाची पाहणी
View this post on Instagram
क्रितीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि कबीर बहिया एका ‘लाइव्ह परफॉर्मन्स’चा आनंद घेताना दिसत आहेत. कबीरने पारंपरिक शेरवानी परिधान केली असून, क्रितीने कॅज्युअल काळ्या रंगाची ‘हुडी’ घातली आहे. दोघेही एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे आहेत. पाठीमागून काढलेल्या या फोटोमध्ये दोघांचे चेहरे स्पष्ट दिसत नसले, तरी चाहत्यांनी कबीरला अचूक ओळखले आहे.
हा फोटो पोस्ट करताना क्रितीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे: “अर्ध्या वर्षाची झलक! काही क्षण जे कधीच ‘इन्स्टाग्राम’वर आले नाहीत… (आणि काही कधीच येणार नाहीत).” तिच्या या कॅप्शनने चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढवली आहे.
ब्रेकअपच्या अफवांना बळ कसे मिळाले होते?
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कबीर बहियाचा एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये तो क्रिती सोडून दुसऱ्या एका मुलीसोबत एका लग्नाला उपस्थित असल्याचे दिसत होते. हा फोटो समोर आल्यानंतर कबीरने क्रितीसोबतचे नाते संपवले असून दोघांचा ब्रेकअप झाला असल्याचा दावा नेटकऱ्यांकडून केला जात होता. मात्र, क्रितीने अप्रत्यक्षपणे हा फोटो शेअर करत त्या सर्व केवळ अफवा असल्याचे सिद्ध केले आहे.





