Breaking-newsताज्या घडामोडी
नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद
नाशिक – नाशिकच्या देवळाली कॅम्पमधील सैनिकी निवासस्थान भागात लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी पहाटे नर बिबट्या जेरबंद झाला. दारणा काठालगत गेल्या 20 दिवसांमध्ये 5 बिबट्या कैद करण्यास वनविभागाला यश आले.
दारणा नदीकाठच्या दोनवाडे, भगूर, देवळाली कॅम्प, पळसे, शेवगेदारणा, बाभळेश्वर, चेहडी, चाडेगाव, सामनगाव, एकलहरे, मोहगाव, कोटमगाव या भागात बिबट्यांचा संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. यानंतर नाशिक पश्चिम वानवा वनविभागाकडून या भागात बिबटे जेरबंद करण्याची मोहिम हाती घेतली. ३८ ट्रॅप कॅमेरे, वीस पिंजरे लावण्यात आले. आज पहाटे देवळाली कॅम्प येथील पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वन्यप्राणी रेस्क्यू वाहनासह धाव घेत तत्काळ पिंजरा ताब्यात घेऊन सुरक्षितपणे हलविले.





