देशातील कोरोना बाधितांचा आकडा 67 हजार पार
नवी दिल्ली | देशातील कोरोना रुग्णांनी 67 हजारांचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 4 हजारांपेक्षा जास्त नवीन प्रकरण समोर आले आहे. तर जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 67 हजार 152 झाली आहे. यामध्ये 2 हजार 206 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हजार 917 लोक आतापर्यंत बरे झाले आहेत. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 44 हजार 29 एवढी आहे.
कोरोनाचा सर्वात जास्त प्रभाव हा महाराष्ट्रात आहे. येथे आतापर्यंत 22 हजार 171 प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये 832 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 4199 लोक बरे झाले आहे. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये संक्रमण वाढत आहे. येथे आतापर्यंत 8 हजार 194 नवे रुग्ण समोर आले आहेत. यामध्ये 493 लोकांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे. येथे आतापर्यंत 7204 केस समोर आल्या आहेत. यामध्ये 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा जवळपास 7 हजारांपेक्षा जास्त झाला आहे. येथे आतापर्यंत 6923 नवे प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये 73 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर राजस्थानमध्ये आतापर्यंत 3814 कंफर्म केस समोर आले आहेत. यामध्ये 107 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.





