Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोनाची भीती अद्याप टळली नाही – पंतप्रधान

नवी दिल्ली | कोरोनाची भीती अद्याप टळलेली नाही, त्यामुळे आपण अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’च्या माध्यमातून केले आहे. आपल्या देशातील लोकसंख्या सर्वात जास्त आहे, तरी देखील इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील रुग्णांची कमी आहे. आज देशातील चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. उद्या पासून देशाच्या काही भागांमध्ये पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरवात होणार आहे. त्यामुळे येते काही दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या लॉकडाऊनच्या काळात अनेक माध्यमांच्या मदतीने इच्छाशक्तीवर भर दिला जात आहे.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब योग्य प्रकारे होताना दिसत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणं देखील सोपं जात आहे. असं म्हणत त्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचं कौतुक केलं आहे. या करोनाच्या संकटाचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो आपली गरीब जनता, कामगार, श्रमिक वर्गाला बसला आहे. असं देखील ते या वेळी म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button