ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

शेवटच्या घटकांपर्यंत भाजपाने साजरी केली दिवाळी अन् भाऊबीज!

शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा विधायक उपक्रम; मावळातील आदिवासी पाड्यांवर मिठाई, कपडे वाटप

पिंपरी । प्रतिनिधी

‘शेवटच्या घटकांपर्यंत विकास…” हा भाजपाचा विचार आहे. या ध्येयानुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार काम करीत आहे. तळागाळातील लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची प्रेरणा त्यामुळे आम्हाला मिळते. यातूनच आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली आणि भगिनींना भाऊबीज भेट दिली. अशा उपक्रमांसाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी भावना पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केली.

BJP celebrated Diwali and Bhaubij till the last elements!
BJP celebrated Diwali and Bhaubij till the last elements!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. याचा आदर्श घेऊन राज्यात भाजपाच्या वतीने आदिवासी पाड्यांवर दिवाळी साजरी करावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत शहर भाजपाच्या वतीने मावळ तालुक्यातील अंदर मावळ भागातील कुसावली, वानगाव, नागवली येथील कातकरी, आदिवासी बांधवासाठी दिवाळी फराळ तसेच महिलांसाठी साडीचोळीचे वाटप करण्यात आले.

BJP celebrated Diwali and Bhaubij till the last elements!
BJP celebrated Diwali and Bhaubij till the last elements!

या कार्यक्रमासाठी कुसावलीच्या सरपंच चंद्रभागा चिमटे, माजी सरपंच कैलास खांडभोर, डाहुली ग्रामपंचायतचे उपसरपंच बळीराम वाडेकर, ग्रामपंचायत सदस्य स्वामी जगताप, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक जयवंतआप्पा बागल, मनोज ढोरे, संतोष पिंपळे, योगेश चोपडे, भाजपाचे सागर फुगे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संजय मराठे, सामाजिक कार्यकर्ते अजय दुधभाते, सुनील कोकाटे, संदीप दरेकर, अनिकेत पाडाळे, संतोष मांदळे, उल्हास असवले, गणेश बँकेचे संचालक प्रमोद ठाकर, उमेश झरेकर, युवराज कदम, शुभम गायकवाड, मिलिंद कंक, जीवन जाधव, सुशांत जाधव, अमित शिंदे, प्रसाद नवले यांच्यासह गावातील तंटामुक्ती कार्यकर्ते, पोलीस पाटील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहर भाजपाच्या वतीने हा विधायक उपक्रम मावळ मतदार संघातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी रबविण्यात आला. विविध पाड्यांवर राहणाऱ्या सुमारे साडेचार हजार आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहणाऱ्या या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर या उपक्रमामुळे आनंद दिसून आला.

शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, अजूनही दुर्गम भागात आपले आदिवासी बांधव राहतात. अतिशय प्रतिकूल परिस्थिती देखील आपल्या संस्कृतीचे ते रक्षण करतात. अशा वेळी या बांधवांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतल्यास आपला आनंद देखील निश्चितच द्विगुणित होणार आहे.

दिवाळी हा दिव्यांचा सण. याच दिवशी दिव्यांच्या साहाय्याने आपण आपले अंगण उजळवतो. ‘वसुधैव कुटुम्बकम’, या प्रमाणे परिस्थितीशी झगडणारे आदिवासी बांधव आपल्या समाजाचा घटक आहेत. अशा पवित्र सणाच्या वेळी खाऊ, फराळ, नवीन कपडे यांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात आनंद पसरविणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. देशाच्या सर्वोच्च ‘राष्ट्रपती’ पदी श्रीमती द्रौपदी मूर्म यांची निवड करीत भाजपा जगाला विधायक संदेश दिला आहे. आदिवासी बांधवांना फराळ आणि भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव मनाला समाधान देणारे होते.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button