TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

सफरचंद आयातीच्या नावाखाली अमली पदार्थांची तस्करी

सफरचंद या फळाची आयात करण्याच्या नावाखाली कोकेन तस्करीचा प्रयत्न महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने(डीआरआय) हाणून पाडला. या कारवाईत ५० किलो २०० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत ५०२ कोटी रुपये आहे. जप्त करण्यात आलेले अंमलीपदार्थ दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणण्यात आले होते.

आठवड्याभरापूर्वीच डीआरआयने दक्षिण आफ्रिकेतून १४७८ कोटी रुपयांच्या मेथॅम्फेटामाइन आणि कोकेनच्या तस्करी केल्याप्रकरणी केरळमधील फळ आयात करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक केली होती. त्याचाच सहभाग याप्रकरणात आढळला असून त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात अंमलीपदार्थांचा साठा जप्त करण्यात येणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्याने व्यक्त केला.

दक्षिण आफ्रिकेतून आयात केलेल्या फळांच्या कंटेनरमध्ये कोकेनचा मोठा साठा असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ५ ऑक्टोबरला डीारआयने नवी मुंबईतील न्हावाशेवा बंदरात शोध मोहिम राबवली. त्यावेळी तेळी कंटेनर फ्रेट स्टेशन(सीएफएस) येथे तपासणीदरम्यान एका कंटेनरमधून त्यात १८८० खोके होते. त्यांच्या तपासणीत कोकेनची ५० पाकिटे सापडली. त्याची तपासणी केली असता त्यात ५० किलो २०० ग्रॅम कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ५०२ कोटी रुपये आहे. अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत हा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

या फळांची आयात केरळस्थित युम्मिट्टो इंटरनॅशनल फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वीच याच कंपनीने आफ्रिकेतून आयात केलेल्या संत्र्यांच्या कंटेनरमध्ये १४७६ कोटींचे अंमलीपदार्थ सापडले होते. त्याप्रकरणी कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक विगिन वर्गीस याला डीआरआयने २ ऑक्टोबरला अटक केली होती. याप्रकरणातही त्याचाच सहभाग निष्पन्न झाल्यामुळे याप्रकरणीही त्याला अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दक्षिण आफ्रिका, ब्राझील, तुर्की आणि इतर देशांतून आरोपीची कंपनी युम्मिट्टो इंटरनॅशनल फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड फळांची नियमीत आयात करते. वर्गिसच्या चौकशीत डीआरआयला मूळचा केरळातील रहिवासी असलेला मन्सूर थचापरंबन याचा याप्रकरणी सहभाग आढळला. मन्सूर हा सध्या दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे असून तो मोर फ्रेश एक्सपोर्ट्र्स प्रायव्हेट नावाच्या कंपनीचा मालक आहे.

करोना काळात मुखपट्टीची आयात करून असताना वर्गिस हा मन्सूरच्या संपर्कात आला. करोना काळात मन्सूरने कमी किमतीत संत्री पाठवल्यामुळे वर्गिसला व्यवसायात चांगला नफा झाला. वर्गीसला ७० टक्के, तर मन्सूरला ३० टक्के नफा मिळायचा. अंमलीपदार्थ राहूल नावाच्या व्यक्तीला देण्यात सांगण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीचा सहभाग असल्याचा डीआरआयला संशय आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button