breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘भाजपने तीन वेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला’; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : भाजपने शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील फोडला असल्याचं अनेक नेत्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या ऑपरेशन लोटसबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपकडून तीन वेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार गटाशी त्यांचा लढा वैचारिक आहे. मात्र एक कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. अजित पवार यांच्यामुळे पक्षात फूट नाही, असं तुम्हाला वाटतं का, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की,घडलेल्या घटना माझ्यासाठी खूप दुर्दैवी आणि निराशाजनक आहे. आता हा विचारधारेचा संघर्ष आहे. मी माझी निवडणूक भाजपच्या विरोधात लढले. मात्र जेव्हा आमच्या पक्षातील काही लोक असा निर्णय घेतात आणि पक्ष विस्कळीत होतो, ते दुर्दैवीच आहे. होय… हे एक भावनिक विभाजन आहे. शेवटी, राजकारण हे धोरणे आणि विचारसरणीचे असते. राजकारण काही नोकरी किंवा व्यावसाय नाही, की आवडलं नाही, तर तिकडं जावं.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये भर दिवसा एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या!

मला वाटत नाही की भाजपसोबत जाण्याचं काही विशेष कारण असेल. फुटलेल्या गटाकडून कोणतेही आरोप करण्यात येत नाही. भाजपशी हातमिळवणी करायची की नाही हा एकच प्रश्न होता. पक्षाच्या काही सदस्यांना ते योग्य वाटलं, तर आम्हाला ते योग्य वाटत नाही. भाजपकडून राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचे यापूर्वीही अनेक प्रयत्न झाले आहेत. यावेळी भाजपने आपली रणनीती बदलत ठेवली. सुरुवातीच्या दोन अपयशानंतर, तिसऱ्यांदा भाजपने मोठी योजना केली. भारताच्या राजकारणात विचारसरणीचा मुद्दा कमकुवत होच चालला आहे. हे दुर्दैव आहे. प्रसारमाध्यमं म्हणतात की याचं कारण सत्ता असू शकतं, कोणी म्हणतं विकास, काहींना वाटत केंद्रीय संस्था, यापैकी काहीही असू शकतं. मात्र यावर भाजपच चांगलं उत्तर देऊ शकतं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

अर्थात हे सर्व खूप निराशाजनक आहे. मात्र संवाद म्हणजे, त्यांना परत येण्याची परवानगी आहे, असं नाही. ते परत येईल की नाही यावर मी भाष्य करू शकत नाही. मात्र आमच्याकडून कुटुंब अबाधित ठेवण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येतील. कुटुंबात राजकारण येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यांनी लोकशाहीत मिळालेल्या अधिकारानुसार, आपला मार्ग निवडला आहे. आमच्यात राजकीय लढाई का व्हावी? असा प्रश्न उपस्थित करताना सुप्रिया सुळे यांनी ही वैचारिक लढाई असल्याचं म्हटलं. आम्ही एक कुटुंब असू, पण वैचारिकदृष्ट्या एकमेकांविरुद्ध लढू, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button