Uncategorized

कसबा विधानसभा पोटनिडणूकः विजयाआधिच उमेदवारांच्या बॅनरबाजीला उत…

पुणेः कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच भाजप आणि महाविकास आघाडीकडून कसबा परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. रवींद्र धंगेकर यांच्यानंतर हेमंत रासने यांचेही बॅनरबाजी करून रासने यांचे विजयानिमित्त अभिनंदन करण्यात आले आहे. भाजप युवा मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष श्रीराम भक्त प्रथमेश सतिश पाठक यांनी कसबा परिसरात ठिकठिकाणी बॅनर लावून रासने यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, या बाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून जोरदार खिल्ली उडविण्यात येत आहे. भाजपचे रासने विजयी होणार हे निकालापूर्वीच अंध भक्तांना कसे कळले, काहीतरी घोळ असेल इव्हीएममधुन, निकाला आधीच यांना काय कळलं कि हेच विजयी झाले, असेही सवाल कमेंटमध्ये विचारले जात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button