breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंडरवर्ल्डचे कर्दनकाळ,सुपरकॉप प्रदीप शर्मा यांना अखेर एन्काऊंटरच भोवले

मुंबई : एकेकाळचे अंडरवर्ल्डचे कर्दनकाळ असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची कारकीर्द झळाळणारी होती. त्यांनी अनेक गुंडांचे नामोनिशान मिठविले याबद्दल त्यांना सरकारकडून वेळोवेळी शाबासकी मिळाली. त्यांच्या कारकीर्दीच्या उतारातील मुंबईतील लखन भैय्या एन्काऊंटर त्यांच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरणारे निघाले. त्यांना या केसमध्ये सत्र न्यायालयाने ज्या मुद्द्यांआधारे निर्दोष सोडले होते. त्याच मद्द्यांवरून मुंबई हायकोर्टाने त्यांना जन्मठेप सुनावली आहे. कधीकाळी एन्काऊंटर स्पेशालीस्ट म्हणून मुंबई पोलिस दलाच्या गळ्यातील ताईत असलेले प्रदीप शर्मा यांना अलिकडे अनेक प्रकरणांनी वादग्रस्त ठरले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत ११३ एन्काऊंटर केली. पोलिसांची नोकरी सोडून राजकारणात पडले. अयशस्वी ठरले. नंतर एंटीलिया केसमध्ये एनआयएने अटक केली, त्यातून जामीन मिळाला तर आता पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना साल २००६ च्या रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या यांच्या खोट्या चकमक प्रकरणात दोषी ठरवित जन्मठेप सुनावली आहे. लखन कथितरित्या गॅंगस्टर छोटा राजन याचा साथीदार होता. लखन भैय्या याचा भावाने आपल्या लखन भैय्याला दिवसाढवळ्या साध्या वर्दीतील पोलिसांनी उचलून नेल्याची तक्रार केली होती. लखनचा भाऊ वकील राम प्रसाद गुप्ता यांनी ही केस लढवित प्रदीप शर्मा यांना अडचणीत आणले आहे.

वकील रामप्रसाद गुप्ता यांनी त्याचा भाऊ लखन भैय्या याच्या अपहरणाची बातमी मुंबई पोलिसांना तार करुन तसेच फॅक्स पाठवून दिली. त्यांना लखन भैय्या याचा एन्काऊंटर होण्याची कुणकुण लागली होती. मुंबई पोलिसांना त्यांनी पोस्टातून पाठविलेला टेलिग्राम ( तार ) आणि फॅक्स मोठा पुरावा बनला. लखन भैय्या याचे अंधेरी पश्चिमेकडील नाना नानी पार्कजवळ एन्काऊंटर झाले. आपला भाऊ लखन याला प्रदीप शर्मा यांनी त्यांच्या केबिनमध्ये लायसन्सी पिस्तुलाद्वारे प्रदीप शर्मा यांनी गोळ्या घातल्या असा आरोप वकील राम प्रसाद गुप्ता यांनी केला होता. परंतू सेशन कोर्टाने शर्मा यांच्या पिस्तुलाच्या बुलेटचा बॅलिस्टीक रिपोर्ट फेटाळला होता. परंतू हाच रिपोर्ट हायकोर्टाने आधारभूत मानला आणि शिक्षा सुनावली.

हेही वाचा – काँग्रेसकडून लोकसभेसाठी ७ नावं निश्चित, पुण्यातून रविंद्र धंगेकर यांना तिकीट

प्रदीप शर्मा उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहीवासी आहेत. प्रदीप शर्मा यांचे वडील इंग्रजीचे प्रोफेसर होते आणि धुळ्यातील एका कॉलेजात नोकरीला होते. त्यांनी कुटुंबाला युपीतून तेथे बोलावले तेथेच वसले. प्रदीप शर्मा यांचे शिक्षण देखील धुळ्यात झाले. त्यांची १९८३ महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली. त्यांना पहीली पोस्टींग मुंबईच्या माहीम पोलिस ठाण्यात मिळाली. त्यानंतर काहीच दिवसात त्यांना जुहु येथील मुंबई पोलिसांच्या स्पेशल पथकात बढती मिळाली.

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डचे राज्य होते. सरकारने अंडरवर्ल्डचा सामना करण्यासाठी एक स्पेशल टीम स्थापन केली. त्यात प्रदीप शर्मा यांची निवड झाली. या टीमने अनेक एन्काऊंटर करुन सराईत गॅंगस्टरना यमसदनी धाडले. या पथकातील पोलिसांना एन्काऊंटर स्पेशालिस्ट असे बिरुद मिळाले, प्रचंड प्रसिद्धी आणि ग्लॅमरचे वलय मिळाले. त्यांनी ११३ एन्काऊंटर केली. त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर यालाही अटक केली.

साल २००६ रोजी प्रदीप शर्मा यांना लखन भैय्या एन्काऊंटर मध्ये दोषी ठरवित साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारने त्यांना २००८ मध्ये पोलिस सेवेतून निलंबित केले. साल २०१३ मध्ये कोर्टाने त्यांना निर्दोष सोडले. साल २०१७ मध्ये त्यांना महाराष्ट्र पोलिस दलात पुन्हा घेतले. परंतू त्यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवित जन्मठेप सुनावली आहे. १९ मार्च २०२३ रोजी न्या. रेवती मोहीत डेरे आणि न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने ट्रायल कोर्टाचा निकाल चुकीचा आणि अस्थिर असल्याचे म्हटले. ट्रायल कोर्टाने शर्मा यांच्या विरोधातील पुराव्यांकडे दुर्लक्ष केले. कायद्याच्या रक्षकांना वर्दीधारी आरोपींसारखे काम करण्याची परवानगी देऊ शकत नाही असे हायकोर्टाने निकाल देताना बजावले.

प्रदीप शर्मा यांनी साल २०१९ मध्ये अचानक व्हीआरएस घेऊन शिवसेनेतून नालासोपारा विधानसभा लढविली होती. परंतू ते निवडणूक हारले. १७ जून २०२१ रोजी एंटीलिया आणि मनसुख मर्डर केस प्रकरणात प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली होती. २५ फेब्रुवारी २०२१ मध्ये मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटक असलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button