breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

चेंबूर रेल्वे स्थानकाजवळच्या जनता मार्केटमध्ये भीषण आग

मुंबई – चेंबूरच्या रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला लागूनच असलेल्या जनता मार्केटमध्ये आज गुरुवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास भीषण आगीची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून ही आग आता आटोक्यात आणली आहे.

ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. जनता मार्केटमधील रेल्वे स्थानकाच्या बाजूच्या एका झेरॉक्स दुकानाला प्रथम अचानक आग लागली. त्यानंतर या दुकानाला लागूनच असलेल्या इतर दोन ते तीन दुकानांत ही आग पसरली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत दुकानातील कागद, झेरॉक्स मशीन आणि फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button