breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सामनातून ‘कमळाबाई’ टीका, आशीष शेलार संतप्त, आम्ही पेंग्विनसेना म्हणू का? उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातील ४० आमदार फोडल्यानंतर राज्यात एकच भूकंप घडला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे देखील काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा होती. पण योगायोगाने आमची भेट झाली, असं दोघा नेत्यांनी स्पष्ट करत संबंधित बातम्या अफवा असल्याचं सांगत मीडियावर रोष व्यक्त केला. आज ‘सामना’त हेच वृत्त प्रकाशित झालंय, पण याचा मथळा कमळाबाई आता ‘हात’घाईवर, असा असून त्यामुळे शेलार चांगलेच संतापले आहेत. त्यांनी सामनाचे संपादक उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा दोन दिवसांपासून होत्या. त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने तर या अफवांचं बातम्यात रुपांतर झालं. मात्र ही भेट गणेशदर्शनाच्या निमित्ताने झालेली होती, ती राजकीय भेट नव्हती, असं दोघा नेत्यांनी स्पष्ट करुन संबंधित बातम्यांचं खंडन केलं. हेच वृत्त प्रकाशित करताना “कमळाबाई आता हातघाईवर, भाजपची काँग्रेसवर वाईट नजर” असा मथळा सामनामध्ये आज छापून आला आहे. याच मथळ्यावरुन मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) चांगलेच संतापले आहेत. तुम्ही कमळाबाई म्हणता, आम्ही तुमच्या उरलेल्या सेनेला पेंग्विनसेना म्हणू का?, असा थेट सवालच त्यांनी सामनाचे संपादक तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातील ४० आमदार फोडल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला होता. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे देखील काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा होती. पण योगायोगाने आमची भेट झाली, असं दोघा नेत्यांनी स्पष्ट करत संबंधित बातम्या अफवा असल्याचं सांगत मीडियावर रोष व्यक्त केला. आज ‘सामना’त हेच वृत्त प्रकाशित झालं, पण याचा मथळा कमळाबाई आता ‘हात’घाईवर, असा असल्याने शेलार चांगलेच संतापले आहेत. त्यांनी सामनाचे संपादक उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे.

आशिष शेलार यांनी पत्रात काय म्हटलंय?
“आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय. हरकत नाही, बाईमध्ये आई-ताई आणि कडक लक्ष्मीपण असते. त्यामुळे तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही आता पेंग्विन सेना म्हणायचं का?”, असा बोचरा सवाल करत असे अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहे, अशी आठवणच शेलारांनी ठाकरेंना करुन दिली आहे.

सामनाचा मथळा काय आहे?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भेटीमुळे कॉँग्रेसमध्ये लवकरच फूट पडणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. झारखंड, दिल्लीमध्ये ‘ऑपरेशन लोटस’चा प्रयत्न फसल्यानंतर भाजप अर्थात कमळाबाईची वाईट नजर आता कॉँग्रेसवर पडली आहे. पक्षांतर्गत नाराजीचा फायदा घेत महाराष्ट्रात कॉँग्रेसमध्ये फूट पाडण्याची ‘हात’घाई भाजपकडून सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button