breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने पटकावला केंद्र सरकारचा ‘कोविड इनोव्हेशन’ पुरस्कार

डोंबिवली – कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने कोविड इनोव्हेशन पुरस्कारात अव्वल क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांअतर्गत या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण-डोंबिवली महापालिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीला संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज खात्याचे राज्यमंत्री हरदीप पुरी यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटीच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशभरातून १०० महानगरपालिकांनी या पुरस्कारासाठी कोविड काळात केलेल्या कामाचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले होते. यामध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आयएमएच्या खासगी डॉक्टरांसह राबवलेल्या फॅमिली डॉक्टर-कोविड फायटरसह खासगी डॉक्टरांच्या ‘कोविड आर्मी’ उपक्रमाची विशेष दखल घेण्यात आली. पहिल्या फेरीत केडीएमसीने पहिल्या १० मध्ये मजल मारली होती. त्यानंतर घेण्यात आलेल्या अंतिम फेरीत वाराणसी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेला संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. लवकरच नवी दिल्ली येथे एका सोहळयात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

हा पुरस्कार म्हणजे आयएमए डॉक्टर्स, खासगी डॉक्टर्स, महापालिका डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांचा, लोकप्रतिनिधी, सर्व नागरिकांचा हा सन्मान असल्याची प्रतिक्रिया माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

पुरस्कार जाहीर होताच अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता सपना कोळी – देवनपल्ली, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, डॉ. प्रतिभा पानपाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने आनंदोत्सव साजरा केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button