breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस’ आगामी महापालिका निवडणुकीत ‘किंगमेकर’ असेल : यश साने

  • पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकारिणीची घोषणा
  • शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, युवकाध्यक्ष विशाल वाकडकर यांची उपस्थिती

 

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला आहे. पक्षाचे सर्वेसार्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आगामी महापालिका निवडणुकीत ‘किंगमेकर’ च्या भूमिकेत राहील, असा विश्वास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सनी मानकर, पुणे विभाग अध्यक्षा संध्या सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यश साने म्हणाले की, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाची ध्येय- धोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील आणि विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्ष संघटनावर भर देण्यात येईल, असेही यश साने यांनी म्हटले आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button