breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भाजपाकडून आचारसंहितेचा भंग

पुणे – भारतीय जनता पार्टीच्या वतीने वडगावशेरी येथील नगर रोडवर लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात भाजपा व शिवसेना पक्षाची बैठक बुधवारी(दि.२७)  आयोजित करण्यात आली होती .या बैठकीला कायदेशीर कोणतीही परवानगी न घेता आयोजन करून  भाजपाकडून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

नगररस्त्यावर इनॉर्बिट मॉलशेजारी शिवांजली मंगल कार्यालयात भाजप उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना व भाजपच्या  पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला चंदननगर पोलिस ठाण्याकडून कोणतीही परवानगी न घेता आयोजित केली होती. या बैठकीला स्पीकर लावून आदर्श आचारसंहितेचा भंग केला म्हणून फिर्यादी ए.पी.ओव्हाळ राज्यकर अधिकारी विक्रीकर भवन यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवार पासून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ येथे निवडणूक कार्यालय येरवडा पुणे भरारी पथकातील प्रमुख नेमणूक करण्यात आलेले आहे. यांनी आरोपी  भारतीय जनता पार्टीचे वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष संतोष लक्ष्मण राजगुरू यांच्या विरोधात आदर्श  आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button