breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

काकाच का? अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून प्रत्युत्तर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये शाब्दिक वार सुरू झाल्याचं दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात शरद पवारांवर टीका केली. काका का असं लिहून प्रचार केला पाहिजे, असं आवाहान अजित पवारांनी केले. यावरून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काका का? या पश्नाला उत्तर दिलं आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या काका का? या टीकेवर प्रश्नाला उत्तर देताना भलीमोठी कविताच म्हणून दाखवली. काटेवाडी पासून ते कारगिलपर्यंत महाराष्ट्रासमोर दिल्लीला झुकवायला काकाच हवा असतो, असे म्हणाले.

कुणीतरी म्हणालं काका का?
जनता म्हणाली अजूनही काकाच का?
पक्ष मिळाला, चिन्ह मिळालं, सगळं मनासारखं झालं
तरी अजूनही काका, का काका?
बोलवताना धनी पुरेपूर जाणतो काका का,
पण महाराष्ट्राल पक्क ठाऊक आहे, काकाच का?

हेही वाचा    –       ‘अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष’; राहुल नार्वेकरांचा निकाल

कारण, काका फक्त माणूस नसतो, काका फक्त नेता नसतो
५० वर्षे महाराष्ट्राच्या मातीतून, महाराष्ट्राच्या माणसांतून वाहणारा
काका एक विचार असतो
सर्वसामान्य शेतकरी, महिला प्रत्येक वर्गाला
मुजोर व्यवस्थेला का? हा प्रश्न विचारण्याची ताकद देतो

काटेवाडीच्या का पासून ते कारगिलच्या का पर्यंत
काळ्या मातीच्या का पासून ते कणखर कातळाच्या का पर्यंत
महाराष्ट्राची, दिल्लीतली ओळख काका, काकाच असतो
कांदा, कापसापासून कारखान्याच्या का पर्यंत
प्रत्येक शेतकऱ्याचा आधारा काका असतो

शेताच्या बांधावर काका असतो, विचारवंतांच्या बैठकीत काका असतो
उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो, म्हणून महाराष्ट्राचा अभिमान काका असतो
म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्रसमोर झुकवण्यासाठी काका हवा असतो
महाराष्ट्राला स्वाभीमानाने लढण्यासाठी काकाच हवा असतो
म्हणूनच, काका का आणि काकाच का हे स्वाभीमानी महाराष्ट्र पुरेपूर जाणतो, अशी कविता अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यात म्हणून दाखवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button