breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारण

Joe Biden असणार अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष; 20 जानेवारी 2021ला स्विकारणार पदभार

अमेरिका: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडन यांनी बाजी मारलेली आहे. या निवडणुकीत बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा दणदणीत पराभव केलेला आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत. 20 जानेवारी 2021 मध्ये बायडन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. पुढील वर्षी 20 जानेवारीला अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जो बायजन हे देशातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती ठरतील.

बायडन यांनी यापूर्वी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळलेला होता. बायडेन या महिन्याच्या 20 तारखेला आपला 78 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. जगातील सर्वात जुन्या लोकशाही देशामध्ये पुढील चार वर्षे देशाचा कारभार डेमोक्रॅटिक पक्षाच्या ताब्यात असण्याचा असणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून इतिहास घडवलेला आहे. हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून येणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आणि आशियाई महिला ठरलेल्या आहेत.

दरम्यान, बिडेन आणि हॅरिस औपचारिक निकालापूर्वीचं आपल्या कामात गुंतलेले आहेत. त्यांनी आरोग्य आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य अजेंडावर लक्ष केंद्रित केले आहे. बायडेन यांनी सांगितले की, ‘आम्ही आमचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा करीत नाही. साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याच्या आमच्या योजनेवर आम्ही काम सुरू केलं आहे.’ या दरम्यान कमला हॅरिस यांचीदेखील उपस्थित होती. जो बायडन यांनी मी विभागणी करणारा नव्हे तर सर्वांना जोडणारा राष्ट्राध्यक्ष असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेने मला सभ्य आणि प्रामाणिकपणे काण करण्यासाठी निवडलेलं असल्याचा विश्वासदेखील बायडन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बायडन यांना 290 तर ट्रम्प यांना 214 इलेक्टोरल मते मिळालेली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button