ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सिंहगड रोड आणि वारजे परिसरात रस्ते अपघातात 16 वर्षीय तरुणासह महिलेचा मृत्यू

पुणे | पुण्यातील सिंहगड रस्ता आणि वारजे परिसरात दुचाकीला अन्य वाहनांची धडक बसल्याने झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सोळा वर्षे तरुण आणि 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मुंबई बंगलोर महामार्गावरील एका पुलावर झालेल्या अपघातात मीना राजेंद्र वामन यांचा (वय 45) मृत्यू झाला. मीना या पतीसह दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगात आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये मीना या खाली पडल्या आणि त्यांना गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. वारजे माळवाडी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तुकाई नगर येथील सिंहगड महाविद्यालयाच्या रस्त्यावर फिर्यादी राजेंद्र बनसोडे यांचा मुलगा आपल्या आईसह दुचाकीवरुन जात होता. या वेळी अज्ञात टँकर चालकाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेला सागर राजेंद्र बनसोडे याच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सिंहगड रस्ता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button