breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कप सेमीफायनल; कधी आणि कुठे पाहता येणार?

U19 World Cup 2024 | अंडर-१९ वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात पोहचली आहे. आज टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेमी फायनल सामना आज होणार आहे. मात्र हा सेमी फायनल सामना कधी आणि कुठे होणार हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेमी फायनल आज दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होणार आहे. हा सामना सहारा पार्क विलोमूर क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तर सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहता येईल.

हेही वाचा    –    पुण्यातील कुख्यात गुंडाचा एकनाथ शिंदेंसोबत फोटो? संजय राऊतांचा हल्लाबोल!

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया :

उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, सचिन धस, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, सौम्य पांडे, राज लिंबानी, नमन तिवारी, आराध्या शुक्ला, इनेश महाजन, धनुष गौडा, रुद्र पटेल , प्रेम देवकर , मोहम्मद अमान आणि अंश गोसाई.

दक्षिण आफ्रिका संभाव्य टीम :

जुआन जेम्स (कॅप्टन), ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), स्टीव्ह स्टोल्क, डेव्हिड टीगर, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान माराइस, रोमाशन पिल्ले, रिले नॉर्टन, ट्रिस्टन लुस, न्कोबानी मोकोएना, क्वेना माफाका, मार्टिन खुमालो, ऑलिव्हर व्हाइटहेड, सिफो पोटसेन, एन्तांडो झुमा आणि रईक डॅनियल्स.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button