breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘शिंदे, अजितदादा कमळावर निवडणुका लढवणार’; शरद पवार गटातील नेत्याचा मोठा दावा

मुंबई : नागपुरमध्ये भाजप-आरएसएस यांची एक वैचारिक बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या रेशीम बाग येथील मुख्यालयात गेले. मात्र, अजित पवार गटाने त्यापासून अंतर ठेवलं. यावरून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले.

हेही वाचा  –  राजद्रोह कलमाची जागा देशद्रोह कलम घेणार; तीन फौजदारी सुधारित कायदे लोकसभेत मंजूर

ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले. ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button