breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाईप लाईट फुटल्याने निगडीसह आकुर्डीतील पाणी पुरवठा विस्कळीत होणार

पिंपरी –  निगडी प्राधिकरणातील जलशुध्दीकरण केंद्र येथून कृष्णानगर टाकीला पाणी पुरवठा करणारी मोठी 700 mm व्यासाची पाईप लाईन आज (सोमवारी 2 जुलैला) दुपारी भक्ती शक्ती याठिकाणी फुटली आहे. त्यामुळे निगडीतील कृष्णा नगरच्या टाकीला होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. परिणामी, सोमवारी संध्याकाळी काळभोर नगर व दवा बाजार चिंचवड स्टेशन याठिकाणी पाणी पुरवठा होणार नाही.

आकुर्डी अजमेरा कॉलनी , नेहरूनगर , कासारवाडी,चिखली,खराळवाडी, मोरे वस्ती, व वल्लभनगर भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. तसेच उद्या सकाळी प्रभाग 14 व 15 मधील विठ्ठलवाडी, क्रांतीनगर, श्रीकृष्ण नगर आकुर्डी गावठाण ,पंचतारा नगर ,मोहननगर, विद्यानागर,इंदिरानगर येथे उद्या सकाळी उशिरा कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे, असे महापालिका पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button