TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणे

हॉकी महाराष्ट्राची दणदणीत विजयी सलामी

पुणे | वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राने आज दणदणीत सलामी दिली. यजमान महाराष्ट्राने मिझोरामचा 18 गोलने पराभव केला. सलग दुसऱ्या दिवशीही गोल धडाका कायम होता. यात झारखंड आणि तेलंगणा यांनीही मोठे विजय मिळविले.पिंपरी चिंचवडमधील नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानवर आज झालेल्या सामन्यात महाराष्ट्राचा विजय उठून दिसला. आम्ही आयोजनच नाही, तर विजयही दणक्यात मिळवू शकतो हे महाराष्ट्राच्या पुरुषांनी दाखवून दिले. त्यांनी मिझोरामचा 18 गोल ने धुव्वा उडवला. या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्णधार तालेब शाब याने सामन्यात डबल हॅटट्रिकसह तब्बल 8 गोल नोंदवले. आतापर्यंत हे स्पर्धेतील सर्वाधिक वैयक्तिक गोल ठरले. या विजाने महाराष्ट्रही एच गटात अव्वल आले. याच गटातील दुसऱ्या सामन्यात बिहारने छत्तीसगडचे आव्हान 4-2 असे परतवून लावले.

दिवसभर गोल धडाका चालूच होता. अखेरच्या सामन्यात त्यात आणखी भर पडली. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला दर्शन गांवकर महाराष्ट्राच्या गोल मोहिमेस सुरवात केली. त्यानंतर अजित सिंगनो 14व्या मिनिटाला दुसरा गोल करून महाराष्ट्राची आघाडी वाढवली. या आघाडीनंतरप मात्र मैदानवर केवळ आणि केवळ तालेब शाह गरजला. त्याने एकामागून एक असे धडाधड आठ गोलांची मालिकाच सादर केली. यजमानांसाठी अन्य गोल वेंकटेओश केंचीने ,महंमद निझामुद्दिन यांनी प्रत्येकी दोन, तर प्रताप शिंदेने ३ गोल केले.

यानंतरही मिझोरामचा गोलरक्षक लालाम्झुआला याने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. त्यांच्या गोलरक्षणामुळे मिझोरामने 18 गोलवर निभावले. अन्यथा त्यांना किती गोल स्विकारावे लागले असते ते तेच जाणो. आज दुसऱ्या दिवशीही गोलांचा पाऊस पडला. आज सात सामन्यात 74 गोलची नोंद झाली. महाराष्ट्रानंतरक तेलंगणा आणि झारखंड यांनीही आपले वजय दोन आकड्यात नेले.

दिवसाची सुरवात हॉकी हब मानल्या जाणाऱ्या ओडिशाने गुजरातचा 8-0 असा पराभव केला. त्यांच्याकडून सुशील धनवर याने तीन गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. याच गटात बंगालने गोव्यावर 8-0 अशाच फरकाने विजय मिळविला. दुसऱ्या मिनिटाला संघाचा पहिला गोल करणाऱ्या रोशन कुमारने पुढे पाच गोल करून विजयात प्रमुख भूमिका बजावली.

अन्य सामन्यात उत्तर प्रदेश संघखाने केरळला 9-0 अशी मात दिली. यात महंमद अमिर, अजय यादव, फराझ महंमद यांनी प्रत्येकी दोन गोल करून आपला वाटा उचलला. झारखंडने आसामवर 11-0 असे वर्चस्व राखले. या सामन्यात स्पर्धेतील गोल शतक पूर्ण झाले. झारखंडसाठी पहिला गोल करताना संदीप मिंझने जेव्हा जाळीचा वेध घेतला तेव्हा ही नोंद झाली. नोएल टोपनो, जेन सोरेंग यांनी हॅटट्रिक साधून झारखंडचा मोठा विजय साकार केला.

दुपारच्या सत्रातील सामन्यात तेलंगणाने हिमाचल प्रदेशाचा 13-1 असा पराभव केला. या सामन्याचे विशेष म्हणजे आतापर्यंत झालेल्या सामन्यात प्रथमच एखाद्या प्रतिस्पर्धी संघाने गोल केला. सूर्य प्रकाश पटलौरी याने चार गोल करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. तेलंगणाचे सर्वच्या सर्व गोल मैदानी होते. पाचजणांनी त्यांच्याकडून गोल नोंदवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button