breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेश

ठरलं तर! गणेश चतुर्थीला Jio AirFiber लाँच होणार, मुकेश अंबानींची घोषणा

Jio AirFiber : जियो युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून जियोच्या एअर फायबरची आतुरतेनं वाट पाहत होते. आता अखेर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओ एअर फायबर सेवा जाहीर केली आहे. आता ही सेवा १९ सप्टेंबरपासून म्हणजेच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुरु होणार आहे. या सेवेच्या माध्यमातून 5G नेटवर्क आणि वायरलेस तंत्रज्ञानाच्या मदतीने घरोघरी आणि कार्यालयांमध्ये वायरलेस ब्रॉडबँड सेवेचा लाभ कोट्यवधी नवीन युजर्सना मिळणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी २०२३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील मोठी घोषणा केली आहे. या सेवेद्वारे कंपनीचा प्रयत्न २० कोटी घरे आणि कार्यालयांपर्यंत पोहोचण्याचा असेल. तसेच दररोज दीड लाख कनेक्शन सहजपणे बसवता येतील. तसेच जिओ एअर फायबरच्या येण्यामुळे दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – लक्ष्य सुर्य! आदित्य एल-१ च्या लँचिंगची तारीख-वेळ ठरली!

जिओची एअर फायबर सेवा काय आहे?

जिओ एअर फायबर सेवेमुळे युजर्सना ब्रॉडबँड प्रमाणे हाय-स्पीड इंटरेनटचा लाभ केबल किवा वायर्स शिवाय मिळेल. यूजर्सना थेट जिओ एअर फायबर डिव्हाइस प्लग-इन करावे लागेल आणि युजर्स वायफाय हॉटस्पॉट प्रमाणे अनेक डिव्हाइसेसवर वेगवान 5G इंटरनेट स्पीड चा लाभ घेऊ शकतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button