पिंपरी / चिंचवड

पिस्तुलाचा धाक दाखवून दागिन्यांची चोरी

पिंपरी l प्रतिनिधी

चार अनोळखी व्यक्तींनी काळेवाडी येथील एका दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातून दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 20) काळेवाडी येथे घडली.

मनसुखलाल घीसुलालजी राठोड (वय 55, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील श्रीकुंज कॉम्प्लेक्समध्ये फिर्यादी यांचे दुकान आहे. रविवारी त्यांच्या दुकानात तीन ते चार अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी फिर्यादी यांच्या डोक्याला पिस्तुल लाऊन धमकी दिली. हाताने मारहाण करून फिर्यादी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, खिशातील व प्लास्टिकच्या बॉक्समधून रोख रक्कम, फिर्यादी आणि त्यांच्या दुकानातील कामगाराचा मोबाईल फोन आणि कार जबरदस्तीने चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button