breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

पत्राचाळ निर्णय प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा संबंध नाही, पत्राचाळ प्रकरणी चौकशी करायची असल्यास करावी – आमदार जितेंद्र आव्हाड

NCP President Sharad Pawar has nothing to do with the correspondence decision process, if there is to be an inquiry in the correspondence matter then it should be done - MLA Jitendra Awhad

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पत्राचाळ प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड जेलमध्ये मुक्कामी आहे. ईडीने त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आव्हाड म्हणाले, “शरद पवारांनी 14 ऑगस्ट 2006 मध्ये मिटींग घेतली होती. देशामधील हाउसिंगबाबतचे सर्व जण या मिटींगला उपस्थित होते. हा प्रकल्प 1988 चा असून तेव्हापासून पत्राचाळीचे टेंडर दारोदारी भटकत राहीले. शरद पवारांना बैठका काही नव्या नाहीत,”

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भातखळकर यांनी पत्र लिहिले आहे. त्याला शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यावेळी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, “पत्राचाळ प्रकरणी तपास यंत्रणेनं चौकशी करावी, चौकशीनंतर आरोप सत्याला धरुन नसेल, तर आरोप करणाऱ्याचे सरकार काय करणार ?, आम्ही चौकशीला जाण्यासाठी तयार आहोत, “

“जेव्हापासून ते राजकारणात आले तेव्हापासून त्यांनी 10-20 हजार बैठका घेतल्या असतील. अनेक प्रकल्पांत त्यांनी मध्यस्थी करून बैठका घेतल्या. सगळे अडकलेले प्रकल्प, कोकण रेल्वेला दिशा देण्याचे काम शरद पवारांनी दिले,” असे आव्हाड म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button