breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

जेट एअरवेज पुन्हा सुरू होणार! १५० कर्मचाऱ्यांची फेरनियुक्ती

मुंबई – गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेली जेट एअरवेज ही विमान सेवा कंपनी आता पुन्हा सुरू होणार असून त्यासाठी कंपनीच्या जुन्याच १५० कर्मचाऱ्यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. २०२२च्या पहिल्या तिमाहीत ही विमानसेवा सुरू करण्याच्यादृष्टीने सध्या कंपनी नवीन सीईओच्या शोधात आहे.

आर्थिक अडचणीमुळे जेट एअरवेज ही मोठी विमान कंपनी बंद पडली होती. मात्र जालान-कालरॉक यांनी जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करून ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ही विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. त्यासाठी कंपनीने १५० जुन्या कर्मचाऱ्यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. याशिवाय नवीन सीईओ नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांबरोबरच काही विदेशी अधिकाऱ्यांचीही चाचपणी केली जात आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button