TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत खेळ रंगला पैठणीचा, सन्मान झाला स्त्री कर्तुत्वाचा

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप महिला मोर्चा, गायत्री सखी मंचकडून कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी l प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा व गायत्री सखी मंच, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने सिने अभिनेते क्रांतीनाना माळेगावकर व सह्याद्री मळेगावकर प्रस्तूत होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सखूबाई गवळी उद्यान, आळंदी रोड, भोसरी येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमासाठी भोसरी विधान सभेचे आमदार महेश लांडगे, चिखली विधान सभेच्या आमदार श्वेता महाले, सिनेअभिनेत्री अश्विनी महांगडे, प्रसिद्ध उद्योजक विनायक भोंगाळे, विद्यमान नगरसेवक सागर गवळी, संतोष लोंढे, सोनाली गव्हाणे, मोरेश्वर शेडगे, विजय भोसुरे, शैला मोळक, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस कविता भोंगाळे कडू, साधना माळेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात भोसरी परिसरातील आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.


आमदार महेश लांडगे म्हणाले की, “आपल्या प्रभागात पाणी, रस्ता, ड्रेनेज या मूलभूत नागरी सुविधा उत्तम रितीने उपलब्ध करून देणे हे प्रत्येक नगरसेवकाचे प्राथमिक कर्तव्य आहे. मात्र गत दोन वर्षात उद्भवलेल्या कोरोंना संसर्गाच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी भोसरी परिसरात केलेल्या अत्यंत बहुमोल कार्यामुळे आपण आज हा कविता ताईनी महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आनंद घेवू शकतो.”
कविता भोंगाळे म्हणाल्या की, “महिलांच्या कर्तुत्वाला वाव देण्याकरीता आमदार महेश लांडगे व शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे हे इंद्रायणीथडी जत्रेच्या माध्यमातून व अन्य सामाजिक उपक्रमातून सतत कार्यरत असतात. त्यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातूनच आज आम्ही जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भोसरी परिसरातील महिलांच्या कर्तुत्वाचा सन्मान करण्याकरीता व गृहिनीं च्या मनोरंजनाकरीता आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.”
आमदार श्वेता महाले म्हणाल्या, “भोसरी विधानसभेतील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भोसरी परिसरात सामाजिक व्यावसायिक, शैक्षणिक व प्रामुख्याने स्त्री सबलीकरणाच्या माध्यमातून कविता भोंगाळे-कडू यांनी विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनातून केलेले काम विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची कार्यतत्परता आगामी काळात ही अशीच राहील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
सिनेअभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांनी उपस्थित महिलांच्या मनोरंजनाकरीता घेतलेल्या छोटेखानी खेळांत सहभागी होवून महिलांनी भरघोस बक्षीसे जिंकली. तसेच विशेष प्राविण्यप्राप्त महिलांना मिक्सर, टीव्ही, कूलर अशी बक्षीसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button