breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

World Cup 2023 साठी सज्ज होतोय जसप्रीत बुमराह, बॉलिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Jasprit Bumrah : World Cup २०२३ ला ५ ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विश्वचषकासाठी सज्ज होताना दिसत आहे. दुखापतीमुळे बराच काळ बाहेर असलेला जसप्रीत बुमराह लवकरच भारतीय संघाच्या जर्सीत पाहायला मिळणार आहे.

जसप्रीत बुमराह पाठीवरील शस्त्रक्रियेनंतर २९ वर्षीय बुमराह सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. या सोबतच भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यरनेही शस्त्रक्रियेनंतर पुन्हा फलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे पुढील महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर होणाऱ्या टी-२० मालिकेत दोन्ही खेळाडू भारतीय संघाचा भाग असू शकतात.

हेही वाचा – ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणे काढण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी’; सुधीर मुनगंटीवार

माध्यामांनी दिलेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह सध्या बीसीसीआय क्रिकेट प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या देखरेखीखाली सराव करत आहे. लवकरच तो भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. नेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून ८-१० षटके गोलंदाजी करत आहे. निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन सप्टेंबरमध्ये आशिया चषकासाठी बुमराहचा समावेश करण्याचा विचार करत आहेत.

जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज आहे. बुमराहने आत्तापर्यंत ७२ वनडे सामन्यात १२१ विकेट्स घेतल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने दोनदा पाच-पाच विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने ३० कसोटी सामन्यात १२८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ६० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत, यात ७० विकेट्स घेतल्या आहेत. तो सप्टेंबर २०२२ मध्ये तो टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button