ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी’ मोहीम

मनसेतर्फे स्वाक्षरी मोहीम : पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग

पिंपरी: मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मंगळवारी (दि.२७) मराठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. त्यामध्ये पदाधिकारी, मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग घेत स्वाक्षरी केली.

‘मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी’ या उपक्रमात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, शहर सचिव रुपेश पटेकर, शहर उपाध्यक्ष राजू सावळे, बाळा दानवले, राजू भालेराव, शैलेश पाटील, अनिता पांचाळ, वैशाली बोत्रे, नितीन चव्हाण, शहर संघटक जयसिंग भाट, नारायण पठारे आदींनी सहभाग नोंदवला.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी भाषेच्या घोषणा दिल्या. तसेच, राज्य शासनाच्या आदेशानुसार पिंपरी- चिंचवड शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राचा गौरव आणि अस्मिता जपण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कायद्याचे उल्लंघन न करता तातडीने दुकानावरच्या पाट्या मराठीत लावाव्या, असे आवाहन केले. मराठीमध्ये त्वरीत पाट्या न लावल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, ज्या दुकानांवर मराठी पाट्या आहेत, त्या दुकानदारांचा निगडी-प्राधिकरण येथे सत्कार करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button