breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणेंना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार

श्रीकांत शिंदे आणि अमोल कोल्हेंना संसदरत्न पुरस्कार जाहीर

Sansad Ratna Award Winners : संसद महारत्न पुरस्कार हा दर पाच वर्षांतून एकदा दिला जातो.संसदरत्न पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त यांसारखे अनेक सदस्यांकडून पुरस्कारासाठी नावांची शिफारस केली जाते. महाराष्ट्रातून अनेक दिग्गजांची नावे यात आहेत.

१७ व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. मागील १६ व्या लोकसभा संसद महारत्न पुरस्कार विजेत्या सुप्रिया सुळे (NCP, महाराष्ट्र), श्रीरंग बारणे (शिवसेना, महाराष्ट्र) आणि भर्त्रीहरी महताब यांची यंदाही सन्मान करण्यात येणार आहे. त्यांना संसद उत्कृष्ट मानरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ,सर्व पुरस्कार विजेत्यांची निवड ज्युरी समितीने पारदर्शक पद्धतीने केली आहे.

महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे, शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह भाजपचे सुकांत मजूमदार, भाजपचे सुधीर गुप्ता आणि काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा यांची पुरस्कारासाठी संबंधित समिती निवड जाहीर केली आहे.

भारतातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या संसद सदस्यांना हा पुरस्कार नागरी समाजाकडून दिला जाणारा एकमेव पुरस्कार आहे. फेब्रुवारी महिन्यात १७ तारखेला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत, त्यांची निवड संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आधारित करण्यात येते.

.हेही वाचा – गेट वेल सून उद्धव ठाकरे विरुद्ध गेट आऊट सून फडणवीस!

संसदरत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष आणि प्राइम पॉइंट फाऊंडेशनच्या विश्वस्त सचिव प्रियदर्शनी राहुल यांनी सांगितले की, एनके प्रेमचंद्रन (आरएसपी, केरळ), अधीर रंजन चौधरी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पश्चिम बंगाल), विद्युत बरन महतो (भाजप, झारखंड) आणि हीना विजयकुमार गावित (भाजप, महाराष्ट्र) यांची संपूर्ण १७ व्या लोकसभेसाठी संसद महारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे

१९९९ या वर्षात स्थापन झालेल्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या एनजीओला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी संसदरत्न पुरस्काराबाबत सूचना केल्या होत्या. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सांगण्यावरून २०१० पासून लोकसभेतील आणि राज्यसभेतील सदस्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल संसदरत्न पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी संसदरत्न पुरस्कार प्रदान केला जातो. तर संसद महारत्न पुरस्कार दर पाच वर्षातून एकदा दिला जातो. केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक यांसारखे अनेक सदस्य या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करत असतात. हा एक प्रकारचा नागरी सन्मान समजला जातो. लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात. त्यामुळे हे पुरस्कार अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button