breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

अवघ्या 33 चेंडूत शतक, रोहित शर्माचा विक्रम मोडला!

T20 Fastest Century:: नेपाळ आणि नामिबिया यांच्यामध्ये २७ फेब्रुवारी रोजी त्रिभुवन यूनिवर्सिटी इंटरनेशनल क्रिकेट ग्राउंडवर सामना पार पडला. या सामन्यात टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम झालाय. याआधी हा विक्रम नेपाळच्या कुशल मल्ला याच्या नावावर होता. ज्याने गेल्या वर्षी मंगोलियाविरुद्ध ३४ चेंडूत शतक केले होते. जान निकोल लॉफ्टी-ईटन यानं रोहित शर्मासह दिग्गजांचा सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडला आहे. रोहित शर्मानं ३५ चेंडूत शतक ठोकलं होतं.

टी २० विश्वचषकाला अवघे तीन महिने शिल्लक राहिले आहेत. त्याआधीच टी २० क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम ध्वस्त झाला आहे. मंगळवारी टी २० विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक आलं. नामिबिया आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात फक्त ३३ चेंडूमध्ये शतक झालेय. नामिबियाच्या जान निकोल लॉफ्टी-ईटन यानं अवघ्या ३३ चेंडूमध्ये शतक ठोकलेय. त्यानं रोहित शर्मा, डेविड मिलर याच्यासह सर्वच दिग्गजांचा विक्रम मोडीत काडलाय. जान निकोल लॉफ्टी-ईटन यानं ८ षटकारांच्या मदतीनं शतकाला गवसणी घातली.

हेही वाचा – अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले..

जान निकोल लॉफ्टी-ईटन यानं नेपाळविरोधात झालेल्या सामन्यात ३३ चेंडूत शतक ठोकलं. हे टी २० क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक म्हणून नोंदवलं गेलं. याआधी नेपाळच्या कुशल मल्ला यानं ३४ चेंडूत शतक ठोकत रेकॉर्ड केला होता. हा विक्रम मंगळवारी मोडीत निघाला. जान निकोल लॉफ्टी-ईटन यानं नेपाळविरोधात ३६ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. यामध्ये ८ षटकार आणि ११ चौकारांचा पाऊस पडला. ११ व्या षटकात त्याने आपला गियर बदलला आणि षटकार चैकारांची आतिषबाजी केली आणि नामिबियाचा धावफलक २०० पार नेला.

टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात वेगवान शतक ठोकणारे फलंदाज –

जान निकोल लॉफ्टी-ईटन- ३३ चेंडू

कुशल मल्ला- ३४ चेंडू

डेविड मिलर- ३५ चेंडू

रोहित शर्मा- ३५ चेंडू

सुदेश विक्रमसेकरा- ३५ चेंडू

जान निकोल लॉफ्टी याच्या शतकाच्या बळावर नामिबियानं प्रथम फलंदाजी करताना ४ विकेटच्या मोबदल्यात २०६ धावांचा डोंगर उभारला. सलामी मालन क्रूगर यानं ४८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ५९ धावांची खेळी केली. जान निकोल लॉफ्टी यानं ३३ चेंडूत शतक ठोकलं. नेपाळकडून कर्णधार रोहित पौडेल याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

नामिबियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळनं १८.५ षटकात १८६ धावांपर्यंत मजल मारली. नेपाळकडून  दीपेंद्र सिंह ऐरी याने ३२ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. नामिबियाकडून रूबेन ट्रम्पेलमैन याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button