breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#JANATACURFEW: ‘रिअल हिरो’च्या कार्याला पिंपरी-चिंचवडकरांचा सलाम- आमदार महेश लांडगे

– ‘जनता कर्फ्यु’ला उद्योगनगरीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसा

– घंटा, थाळीनाद आणि टाळ्या वाजवून कृतज्ञता

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

‘वॉर अगेंस्ट कोरोना’ अशी स्थिती देशात निर्माण झाली आहे. त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक सुविधा देणारे कर्तव्यदक्ष नागरिक, आरोग्य सुविधा देणारे डॉक्टर, पोलीस कर्मचारी आदी आमच्या ‘रिअल हिरोंना’ पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने सलाम, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोरोना’चा प्रतिकार करण्यासाठी आज, दि २२ मार्च रोजी सकळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘जनता कर्फ्यु’ची घोषणा केली होती. तसेच, देशातील या प्रतिकूल परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या डॉक्टर आणि तत्सम सर्व घटकांप्रति कृतज्ञता म्हणून सायंकाळी ५ वाजता पाच मिनिट टाळ्या, घंटा आदी वाजवून आभार मानावे, असे आवाहनही केले होते. राज्य सरकारनेही तसे निर्देश दिले होते. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. सजग नागरिकांनी दारावर / खिडक्या/ बाल्कनीत उभे राहून घंटानाद / टाळ्या वाजवून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी आपले आभार व्यक्त केले.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, ‘कोरोना’ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि संबंधित सर्व आस्थापने कसोशीने प्रयत्न करीत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकही सतर्क झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला शहरवासीयांनी अपेक्षित प्रतिसाद दिला, याबाबत मी सर्वांचे आभार मानतो. तसेच, आम्हाला अत्यावश्यक सुविधा देणारे सर्व डॉक्टर, पोलीस कर्मचारी, वैद्यकिय कर्मचारी, औषधालय चालक, महापालिका आरोग्य कर्मचारी आदी सर्व लोक आमच्यासाठी ‘रिअल हिरो’ आहेत. त्यांच्या कार्याला आम्ही पिंपरी-चिंचवडकर सलाम करतो.

दरम्यान, ‘जनता कर्फ्यु’चे शहरातील नागरिकांनी तंतोतंत पालन केले आहे. भारत सरकारच्या ‘जनता कर्फ्यु की शपथ’ या मोहिमेलाही शहरवासीयांनी प्रतिसाद देत, प्रतिज्ञा ग्रहण केली व प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअरही केले. या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचेही आमदार लांडगे यांनी आभार मानले आहेत.
*****
शहरवासीयांना आवाहन…
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी नागरिकांकडून सहकार्य आवश्यक आहे. गरज नसल्यास लोकांनी घराच्या बाहेर निघू नये. पुढील काही आठवडे घरीच थांबावे. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी घरा बाहेर पडू नये. नियमित तपासणी किंवा अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रिया टाळाव्यात. अकारण वैद्यकीय व्यवस्थेवरचा भार वाढू नये याची काळजी घ्यावी. अत्यावश्यक वस्तूंचा गरजे पेक्षा जास्त संग्रह करू नका. अत्यावश्यक वस्तूंची कमतरता उद्भवणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. उच्च आर्थिक वर्ग, कंपन्या, व्यापारी यांनी कर्मचारी वर्गाला पगारी सुट्ट्या द्याव्या. त्यांचे आर्थिक नुकसान न होण्याची काळजी माणुसकीच्या दृष्टीने घ्यावी, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी शहरवासीयांना केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button