ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
संस्कार भारतीच्या वतीने बालदिनानिमित्त रांगोळी वर्ग व चित्रकला स्पर्धा
पिंपरी चिंचवड | संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीच्या वतीने बालदिनानिमित्त (रविवारी, दि.14) रांगोळी वर्ग व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.हुतात्मा चाफेकर शाळा, चाफेकर चौक येथे रविवारी सकाळी 10 ते 11.30 रांगोळी प्रशिक्षण वर्ग भरला जाईल. स्पर्धेदरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळले जाणार आहेत.
तसेच, कॅम्लिन प्रायोजित बालदिन विशेष चित्रकला स्पर्धा जिजाऊ पर्यटन केंद्र, श्रीमान मोरया गोसावी मंदिराशेजारी, चिंचवड सकाळी 8 ते 12 यावेळेत आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी 9 ते 12 आणि 13 ते 16 असे दोन वयोगटात तयार करण्यात आले आहेत.