breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराष्ट्रिय

JAM 2021 प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरायला सुरूवात

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन २०२० परीक्षेचं यशस्वी आयोजन केल्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने जॉइंट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स (JAM) 2021 च्या तारखांची घोषणा केली. ही परीक्षा १४ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालक गोविंदन रंगराजन यांनी बुधवारी या परीक्षेबाबतची माहिती दिली. या परीक्षेचे अर्ज भरायला १० सप्टेंबर पासून सुरूवात झाली आहे.

उमेदवार १० सप्टेंबर २०२० ते १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज भरू शकतात. JAM परीक्षेसाठी वयाची कोणतीही अट नाही. जेएएम परीक्षेचा स्कोर एका वर्षासाठी वैध असतो. २०२०-२१ मधील मास्टर्स अभ्यासक्रमांसाठी जेएएम २०२१ चा स्कोर वैध असेल.

JAM ही प्रवेश परीक्षा आयआयटी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संयुक्तपणे आयोजित करतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या देशभरातील ८ झोन्स आणि ७ आयआयटींसाठी ही परीक्षा होते. २०२१ मधील JAM च्या आयोजनाची जबाबदारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरूकडे आहे.

MHT-CET परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर

ही संगणक आधारित परीक्षा असून १४ फेब्रुवारी २०२१ रोजी दोन सत्रात या परीक्षेचे आयोजन होणार आहे. निकाल २० मार्च २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. परीक्षेत तीन प्रकारचे प्रश्न असतील – १) मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स (MCQ), २) मल्टीपल सिलेक्ट क्वेश्चन्स (MSQ), ३) न्यूमरिकल आन्सर टाइप (NAT).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button