breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अजितदादांचा हुकमी एक्का असलेला ‘हा’ आमदार ऐनवेळी का पलटला?

सोलापूर : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या गोटात राजकीय भूकंप झाला आहे. कोण फुटलं? कसं काय फुटलं? याची आता चर्चा सुरू झाली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांचं मत शिवसेनेच्या संजय पवारांना मिळालं नाही, असा खुलासा खुद्द संजय राऊत यांनी केलाय. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले आमदार संजय शिंदे फुटल्याने आता थेट आघाडी सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

मूळ संजय शिंदे यांचे राजकीय गुरू हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या एकूण राजकारणात अकलूजच्या मोहिते-पाटलांना शह देण्यासाठी अजित पवारांनी मोहित्यांच्या विरोधात संजय शिंदे यांना वेळोवेळी ताकद दिली. २०१४ नंतर राज्यात भाजपची सत्ता आल्यावर आमदार शिंदे हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात गेले. आपली अडलेली कामे करुन घेतली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत भाजपला अनुकूल परिस्थिती पाहून त्यांनी आधी भाजपकडून उमेदवारी मिळवायचा प्रयत्न केला. मात्र करमाळ्याचे सेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील हे भाजप सोबत गेल्याने, शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर निवडणूक लढवली अन् जिंकलीही.

कोणतीही राजकीय गोळाबेरीज करण्यात पटाईत असलेल्या आमदार शिंदे यांनी एकीकडे महाविकास आघाडीला तर दुसरीकडे एक हाच्चा म्हणून भाजपच्या फडणवीसांसोबत संबंध कायम ठेवले. त्यामुळे भल्या पहाटे शपथ विधी करणारे राज्यातील दोन्ही ताकदवान नेत्यांशी स्नेह ठेवण्याचे काम शिंदे यांनी केले. एवढंच नव्हे तर ते उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भाजपशी असलेला धागा म्हणून कार्यरत राहिले. सोलापूर जिल्ह्यातील बारामतीकरांचे निष्ठावंत असेलल्यापैकी आमदार शिंदे हे शरद पवारांपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत. हे स्थानिक साखर कारखान्याच्या राजकारणातून अनकेदा स्पष्ट झाले आहे. शिवाय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पदरांत पाडून घेण्याची तीव्र इच्छा असलेले आमदार शिंदे हे राष्ट्रवादीवर नाराज आहेत. ती नाराजीही या राज्यसभा निवडणुकीच्यानिमित्ताने व्यक्त झालीय. त्यामुळे त्यांचं मत फुटलं, असं मानलं जात आहे.

चाणक्य तोंडघशी पडले

आमचं लक्ष्य माशाच्या डोळ्यावर असल्याचे सांगणाऱ्या महाविकास आघाडीचे चाणक्य शरद पवारांना आता देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करावे लागत आहे. त्यामुळे आता या पराभवानंतर महाविकास आघाडीतल्याच नेत्यांनी पडद्यामागे अपक्ष आमदारांना हाताळण्यात दिशा दिली असल्याचे बोलले जात आहे. एकूण या घडामोडी पाहता राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत रस राहिला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button