breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरद पवारांचा भाजपला धक्का, आमदार कर्डिलेचे पुतण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये दाखल झाले आहेत. नगरमध्ये जाताच त्यांनी भाजपला पहिला धक्का दिला. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे रोहिदास आणि देवीदास कर्डिले यांनी राष्ट्रवादीत प्रचार केलाय. भाजपचे उमेदवार सुजय विखेंसाठी हा धक्का मानला जात आहे.

रोहिदास आणि देवीदास हे शिवाजी कर्डिले यांचे बंधू आप्पासाहेब कर्डिले यांचे चिरंजीव आहेत. तर देवीदास बाणेदार दूध संघाचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या जनसंपर्काचा फायदा राष्ट्रवादीला होण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप हे शिवाजी कर्डिलेंचे जावई आहेत. त्यामुळे या नात्या-गोत्यांच्या राजकारणात नगरची लढत रंगतदार होणार आहे.

नगरमध्ये काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुलासाठी विखे पाटलांनीही बैठका सुरु केल्याचं बोललं जातंय. विखे आणि पवार घराण्याचं वैर जुनं आहे. त्यामुळे स्वतः शरद पवारच नगरमध्ये बैठका घेत आहेत. विखे पाटील सध्या काँग्रेसमध्येच आहेत, पण नगरमध्ये प्रचार करणार नाही, असं त्यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं.

नगरमध्ये विखे पाटलांचीच मदत होणार नसल्याने राष्ट्रवादीचीही अडचण आहे. शिवाय भाजपमधून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष लढण्याचा इशारा दिलाय. दिलीप गांधींना डावलून सुजय विखेंना तिकीट दिल्यामुळे दिलीप गांधींचे कार्यकर्ते नाराज आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button