breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील ‘आयर्न मॅन’ यांचा संकेत भोंडवे (IAS) यांच्या हस्ते सन्मान

पिंपरी: रोजी कझाकिस्तान देशाची राजधानी शहर नूर सुलतान येथे पार पडलेल्या आयर्न मॅन स्पर्धेमध्ये ट्राय फिट झोन पिंपरी चिंचवड या ग्रुपमधील  १)राम गोमारे २) सचिन वाकडकर ३) पांडुरंग बोडके यांनी आयर्न मॅन हा मानाचा किताब पटकाविला आहे.

हा किताब मिळवल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या ‍शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.इशिम नदीच्या थंडगार पाण्यात ३.८ किमी पोहणे, हेड विंड क्रॉस विंड मध्ये १८० किमी सायकल चालवणे आणि दिवसा गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी धावणे हा अतिशय खडतर प्रवास पूर्ण करणे जिकीरीचे काम होते, ते काम या तिघांनी अतिशय जिद्दीने पूर्ण केले आहे.

त्यांचा सत्कार समारंभ हॉटेल संकेत इन, वाकड येथे  IAS संकेत भोंडवे यांच्या हस्ते  आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाचे आयोजन युवराज वाकडकर यांनी केले होते.या प्रसंगी ते बोलत होते
या स्पर्धेच्या प्रवासात स्वतःची लढाई स्वताच्या संयमाशी असते, सतत १६-१७ तास न थांबता हा प्रवास करताना शरीर कोणत्या वेळी वेगळे वळण घेईल हे सांगता येत नाही, रेसच्या दिवशी बॉडी थकली तरी चालेल पण मन थकले नाही पाहिजे अशी भावना सर्व ट्रायथलिट यांनी व्यक्त केली.

IAS संकेत भोंडवे यांनी  त्यांचे कौतुक करताना त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करतानाच्या काही आठवणी उपस्थितांना सांगितल्या, या सत्कारमूर्ती च्या प्रवासाची गोष्ट ऐकताना त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी केलेल्या मेहनतीची आठवण झाली. या ट्रायथलिट त्रिकुटानचे पिंपरी चिंचवड व पुणे शहरातून अभिनंदन होत आहे.

याप्रसंगी विशाल वाकडकर, अमोल भोंडवे, डॉ. श्रीनाथ कवडे,अभिजित भोंडवे,रामदास वाकडकर, दिपक वाटेकर, मिलिंद चव्हाणके, बाबा कांबळे, अमोल वाकडकर, महेंद्र मोटे उपस्थित होते.  डॉ श्रीनाथ कवडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button