breaking-newsआंतरराष्टीय

५ ऑगस्टचे राममंदिर सेलिब्रेशन झळकणार न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर

न्यूयॉर्क – अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन येत्या ५ ऑगस्टला होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त देशभरासह जगभरातील राम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्वांच्या नजरा राममंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर लागल्या आहेत. या ऐतिहासिक क्षणाला खास बनवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच भारतासह सातासुमद्रापार अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्येही या क्षणाला खास बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमधील बिल बोर्ड्स आणि स्क्रिनवर भगवान रामाचे फोटो आणि राममंदिराचे थ्रीडी फोटो झळकणार आहेत.

न्यूयॉर्कमधील भारतीयांची संघटना अमेरिकन इंडिया पब्लिक अफेअर्स कमिटीने ५ ऑगस्टच्या राममंदिर कार्यक्रमाला खास बनवण्याची तयारी केली आहे. कमिटीचे अध्यक्ष जगदीश सेहनी यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५ ऑगस्ट रोजी जेव्हा राममंदिराचे भूमिपूजन करतील तो दिवस आमच्यासाठी खास असेल. टाईम्स स्क्वेअरच्या एईडी स्क्रिन भाड्याने घेण्यात आल्या आहेत. यामध्ये एक नॅसडॅक स्क्रिन आणि दुसरी १७ हजार स्क्वेअर फुटांची मोठी स्क्रिन आहे, जी जगप्रसिद्ध आहे.

५ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत संपूर्ण दिवस हिंदी आणि इंग्रजीमध्ये ‘जय श्री राम’ लिहिलेला स्क्रोल सुरू राहणार आहे. सोबत भगवान श्री राम यांचा फोटो आणि मंदिराचे आर्किटेक्चर थ्रीडीमध्ये आणि अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाचे व्हिडीओ स्क्रिनवर झळकतील, अशी माहिती सेहनी यांनी दिली. पुढे सेहनी म्हणाले की, जगभरातील हिंदूंसाठी हा ऐतिहासिक आणि आयुष्यात एकदा येणारा क्षण आहे. त्या दिवशी न्यूयॉर्कमधील भारतीय टाईम्स स्क्वेअर येथे जमतील आणि मिठाई वाटून तो दिवस साजरा करतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button