breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सुप्रिया सुळे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली – परमबीर सिंग यांच्या लेटर बाॅम्बमुळे गृहमंत्र्यांसहीत ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठत आहे. या सर्व प्रकारात ठाकरे सरकारची मोठी बदनामी झाली आहे. त्यानंतर सरकारमधील मंत्री आणि नेते आता खडबडून जागे झालेले दिसून येत आहेत. या सर्व प्रकारानंतर महाविकास आघाडीच्या गोटात वेगवान हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्याच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

वाचा :-महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवलेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट

आपण सोनिया गांधी यांची भेट घेतली असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत दिली आहे. तुमच्यासाेबत चर्चा करणं हे नेहमीच आनंददायी असतं. तुमच्या बहुमुल्य मार्गदर्शनासाठी खुप खुप आभारी आहे, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून सोनिया गांधी यांनी सरकारच्या कारभारात याआधी हस्तक्षेप केला नव्हता. पण आता राज्यात घडलेली प्रकरणे सरकारच्या अंगलट येत असल्याने सोनिया गांधी यांचं मार्गदर्शन ठाकरे सरकार घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानावर बैठकांचा धडाका लावताना दिसत आहेत.

दरम्यान, बुधवारी रात्री मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाश देसाई आदी मंत्री उपस्थित होते. त्यामुळे सरकार यापुढे काय पावले उचलणार त्यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button