व्यापार

गेरा डेव्‍हलपमेंट्सकडून निवासी क्षेत्रांमध्‍ये आणखी एक नाविन्‍यपूर्ण विभाग

पुणे | गेरा डेव्‍हलपमेंट्स या अनेक अग्रणी प्रकल्‍पांचे श्रेय असलेल्‍या रिअल इस्‍टेट व्‍यवसायामधील अग्रणी आणि पुणे, गोवा व बेंगळुरूमध्‍ये प्रिमिअम निवासी व व्‍यावसायिक प्रकल्‍प निर्माण करणा-या पुरस्‍कारप्राप्‍त कंपनीने अपर खराडी* येथील गेराज वर्ल्‍ड ऑफ जॉयमध्‍ये न्‍यू नॉर्मलशी साजेसे असे ‘स्‍टेकेशन होम्‍स’ सादर करत निवासी क्षेत्रांमध्‍ये आणखी एका नाविन्‍यपूर्ण विभागाची निर्मिती केली आहे.

‘आउटडू’ अर्थात ‘मागच्यापेक्षा वरचढ’ हे कंपनीचे तत्त्वज्ञान आहे. त्यांनी अत्‍यंत यशस्‍वी ठरलेल्‍या चाइल्डसेंट्रिक®च्‍या पार्श्‍वभूमीच्‍या आधारावर ‘स्‍टेकेशन होम्‍स’ सादर करण्‍यासह उल्‍लेखनीय नाविन्‍यपूर्ण प्रकल्‍पाची निर्मिती केली आहे. असे करत त्‍यांनी बांधकाम क्षेत्राचे चित्र विकासक आणि घर खरेदीदार या दोहोंसाठी पूर्णपणे बदलले आहे. ग्राहकांच्‍या इच्‍छा व जीवनशैली लक्षात घेत लिव्हिंग स्पेसेस हा नवीन विभाग स्‍थापित करण्‍यासाठी कंपनी ओळखली जाते. गेराने केवळ बांधकाम क्षेत्राच्या मार्केटिंग आणि ब्रॅण्ड उभारणीत नवीन मापदंड स्थापन केले नाहीत, तर बांधकाम क्षेत्रात सेवा अभिमुखतेचे नवीन मानकही घालून दिले. स्‍टेकेशन एक संकल्‍पना म्‍हणून शहरामध्‍ये लहानशा सुट्टीचा आनंद घेऊ पाहणा-या ग्राहकांना आवाहन करते. म्‍हणूनच गेराचा ‘स्‍टेकेशन होम्‍स’ प्रकल्‍प एक संकल्‍पना म्‍हणून या गोष्‍टीशी संलग्‍न आहे. हा प्रकल्‍प कुटुंबांना अविरत स्‍टेकेशन्‍सचा आनंद देण्‍यासोबतच प्रकल्‍पामधील अनेक सुविधांचा देखील लाभ देतो.

गेरा डेव्‍हलपमेंट्सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित गेरा म्‍हणाले, ”यंदा महामारीमुळे जीवनशैलीमध्‍ये झालेला बदल जाणून घेत आम्‍ही ‘स्‍टेकेशन होम्‍स’ची संकल्‍पना सादर केली. हा प्रकल्‍प आमच्‍या ग्राहकांना आवाहन करेल आणि त्‍यांच्‍या पसंतीच्‍या खरेदीला साजेसा असेल. नवीन युगामध्‍ये नवीन विचार व नाविन्‍यपूर्ण कल्‍पनांना मागणी आहे. बांधकाम क्षेत्र एक मालमत्ता वर्ग म्‍हणून परिपूर्ण झाले आहे. बाजारपेठेमध्‍ये सहभागी होणा-यांना हे समजले पाहिजे आणि त्‍यांनी अधिक पुढे जाऊन विचार करत गेम चेंजर्स बनले पाहिजे. आम्‍ही नेहमीच आमच्‍या ग्राहकांच्‍या रूची व पसंतीच्‍या खरेदींची पूर्तता केली आहे.”

गेरा पुढे म्‍हणाले, ”प्रिमिअम राहणीमान अनुभव देताना बदलत्‍या जीवनशैलीला अनुसरून नाविन्‍यपूर्ण बांधकाम क्षेत्र व गृहनिर्माणावरील आमच्‍या अविरत फोकसमधून स्‍टेकेशन होम्‍स संकल्‍पना उदयास आली आहे. याच दृष्टिकोनामुळे आम्‍ही यापूर्वी मुलांची सुरक्षितता, अध्‍ययन व विकासाची खात्री घेण्‍यावर लक्ष केंद्रित करणा-या चाइल्‍डसेंट्रिक® होम्‍सची निर्मिती केली. आम्‍ही आमचे प्रकल्‍प सादर करण्‍यापूर्वी नेहमीच बाजारपेठ स्थिती, ग्राहक संवेदनशीलता आणि अभिप्रायाचे मूल्‍यांकन करतो. यावेळी देखील आम्‍ही सुरू असलेली कोविड-१९ महामारी आणि ग्राहक व त्‍यांच्‍या जीवनशैलीवर महामारीचा परिणाम, सुरक्षित वातावरणामध्‍ये त्‍यांच्‍या गरजांची पूर्तता याचे सखोलपणे निरीक्षण केले आहे आणि ‘स्‍टेकेशन होम्‍स’च्‍या अद्वितीय ऑफरिंगसह प्रतिसाद दिला आहे.”

गेराज वर्ल्‍ड ऑफ जॉयमध्‍ये असलेले ‘स्‍टेकेशन होम्‍स’ हे योग्‍य आकाराचे स्‍टुडिओ अपार्टमेंट्स (चटई क्षेत्र २६७ चौरस फूट) आहे. हे स्‍टुडिओ अपार्टमेंट्स ‘न्‍यू नॉर्मल’ जीवनशैलीशी साजेसे अशा स्‍वरूपात डिझाइन करण्‍यात आले आहेत आणि यामधून पुण्‍यातील दुसरा चाइल्‍डसेंट्रिक® होम्‍स प्रकल्‍प असलेल्‍या गेराज वर्ल्‍ड ऑफ जॉयकडून देण्‍यात येणा-या जागतिक दर्जाच्‍या सुविधांचा आनंद मिळतो. गेरा डेव्‍हलपमेंट्सच्‍या या प्रिमिअम निवासी प्रकल्‍पाला नोव्‍हेंबर २०१९ मध्‍ये सादर केल्‍यापासून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. फेज १ ची पूर्णत: विक्री झाली आहे. गेरा डेव्‍हलपमेंट्स ही अद्वितीय घरे आकर्षक योजनेअंतर्गत ३२.९ लाख रूपये या सर्वसमावेशक किंमतीमध्‍ये देत आहेत. या आकर्षक योजनेमध्‍ये ग्राहकांना बुकिंगच्‍या वेळी फक्‍त २.९ लाख रूपये आणि शासकीय कर भरावे लागतात आणि घराचा ताबा मिळाल्‍यानंतर उर्वरित रक्‍कम भरावी लागते.

उच्‍च दर्जाच्‍या एर्गोनॉमिक डिझाइनसह ‘स्‍टेकेशन होम्‍स’मध्‍ये फिटनेस, मनोरंजन व आरामासाठी अनेक जागतिक दर्जाच्‍या सुविधा आहेत जसे क्‍लबहाऊस, इनडोअर क्‍लायमेट कंट्रोल्‍ड हाफ ऑलिम्पिक साइज स्विमिंग पूल, बॅडमिंटन कोर्टस्, स्‍क्‍वॅश कोर्टस्, जिम्‍नॅटिक्‍स हॉल्‍स, तसेच डान्‍स स्‍टुडिओ, आर्ट स्‍टुडिओ व गेमिंग रूम्‍स, जिम्‍नॅशियम, योगा व मेडिटेशन एरिया, म्‍युझिक रूम, लहान मुलांचे संगोपन केंद्र (शिशुगृह), लहान मुलांसाठी खेळण्‍याचे मैदान, सायकलिंग ट्रॅक इत्‍यादी. आऊटडोअर भागांमध्‍ये टेनिस कोर्टस् व इतर आऊटडोअर सुविधा आहेत. घरांमध्‍ये डेफ्टच्‍या स्‍मार्ट होम डिवाईसेससह गुगल एकीकृत वॉईस-कंट्रोल होम ऑटोमेशन सुविधा आहे. तसेच इतर उल्‍लेखनीय लेजर सुविधा आहेत- जसे रॉक-क्‍लायम्बिंग वॉल, स्‍केटिंग रिंक व मिनी थिएटर. म्‍हणूनच हा प्रकल्‍प मनोरंजनपूर्ण व्‍हेकेशनसह आरामदायी घरासह सुसज्‍ज आहे. अपर खराडी* येथील ‘स्‍टेकेशन होम्‍स’मध्‍ये एैसपैस जागा आहे. हे क्षेत्र अत्‍यंत शांतचित्त असून जवळच शाळा व महाविद्यालये, हॉस्पिटल्‍स आणि रिटेल स्‍टोअर्स व मार्केट्स आहेत. हे क्षेत्र रेल्‍वे स्‍टेशन, तसेच विमानतळापासून देखील जवळ आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button