breaking-newsमनोरंजन

फतेह रंधावाला लॉन्च करणार करण जोहर

बॉलिवुडमध्ये यशस्वीपणे पर्दापण करून देण्यासाठी चित्रपट निर्माता करण जोहर याच्यावर स्टार पॅरंट्‌सचा सर्वाधिक विश्‍वास आहे. आलिया भट्‌ट, वरुण धवन, जान्हवी कपूर, अनन्या पांडेसहित अनेक युवा कलाकारांचे यश पाहून सर्वांचा विश्‍वास करण याने सार्थकी ठरविला आहे.

या लिस्टमध्ये आता आणखी एक स्टारकिड्‌स फतेह रंधावा याचे नाव समाविष्ट होणार आहे. फतेह रंधावा हा विंदु दारा सिंह आणि अभिनेत्री फरहा नाज यांचा मुलगा आहे. फतेह हा “दोस्ताना’च्या सीक्‍वलमधून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. “दोस्ताना-2’साठी कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर हे मुख्य भूमिका साकारत आहेत.

चित्रपट निर्माता करण जोहरला फतेहकडून खूपच अपेक्षा आहेत. ज्याप्रमाणे वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याकडून होती. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु विंदु हे आपल्या मुलाची मेहनत पाहून खूश आहेत. कारण फतेह हा गेल्या 4 वर्षांपासून अभिनयाचे धडे घेत असून कठीण परिश्रम घेत आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटातून आणखी एक जण डेब्यू करणार आहे आणि त्याचे नाव लक्ष्य आहे. याबाबत खुद्‌द करण जोहर याने ट्‌वीट करत माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button