breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL2020: राजस्थान राॅयल्स संघाचा किंग्ज इलेव्हन पंजाब टीमवर ४ गड्यांनी विजय

आबुधाबी – राहुल टेवाटियाचे अर्धशतकासह एकाच षटकातील पाच षटकार… स्टीव्हन स्मिथ आणि संजू सॅमसन यांची झंझावाती अर्धशतक, या दमदार फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन ंपंजाबवर विजय साकारला. पंजाबने राजस्थानपुढए विजयासाठी २२४ धावांचे आव्हान ठेवले होते. राजस्थानने तीन फलंदाजांच्या अर्धशतकाच्या जोरावर हे आव्हान लीलया पेलले.

पंजाबच्या २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची चांगली सुरुवात झाली नाही. कारण राजस्थानच्या संघातून आज पहिलाच सामना खेळणाऱ्या जोस बटलरला यावेळी फक्त चारच धावा करता आल्या. त्यानंतर राजस्थानचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि संजू सॅमसन यांची जोडी चांगलीच जमली. या सामन्यातही स्मिथ आणि संजू यांची जोडी जमल्याचे पाहायला मिळाले. पण यावेळी स्मिथ बाद झाला आणि ही जोडी फुटली. स्मिथने यावेळी २७ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर स्मिथ आणि संजू यांच्यांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी पाहायला मिळाली.

स्मिथ बाद झाल्यावर संजूने जोरदार फटकेबाजी केली, पण त्याला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. संजूने ४२ चेंडूंत चार चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर ८५ धावांची खेळी साकारली. संजू बाद झाल्यावर सुरुवातीला सावध खेळणाऱ्या राहुल टेवाटियाने १८व्या षटकात पाच षटकार लगावले आणि सामना राजस्थानच्या बाजूने फिरवला.

राजस्थानने नाणेफेक जिंकून यावेळी पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पंजाबने राजस्थानचा हा निर्णय चुकीचा असल्याचे दाखवून दिले. कारण पंजाबच्या मयांक आणि राहुल यांनी राजस्थानच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. मयांक आणि राहुल यांची सुरुवात थोडी सावधपणे झाली. पण त्यानंतर फारच कमी वेळात त्यांनी राजस्थानच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करायला सुरुवात केला. या दोघांच्या फटकेबाजीपुढे राजस्थानचे गोलंदाज निष्प्रभ झाल्याचेच पाहायला मिळाले.

मयांकडून यावेळी धडाकेबाज फलंदाजीची नमुना पाहायला मिळाला. कारण मयांकने यावेळी फक्त ४५ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. आयपीएलमधील मयांकचे हे पहिले शतक ठरले. शतक झळकावल्यावरही मयांकडून तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. मयांकने यावेळी धडाकेबाज फलंदाजी केली, पण त्याला टॉम कुरनने यावेळी बाद केले. पण बाद होण्यापूर्वी मयांकने ५० चेंडूंत १० चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर १०६ धावांची तुफानी खेळी साकारली.

मयांक बाद झाल्यावर लोकेश राहुलने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. यावेळी त्याला ग्लेन मॅक्सवेलची चांगली साथ मिळाली. कारण मॅक्सवेलने कमी चेंडूंत जलदगतीने धावा जमवल्या. या दोघांनी संघाला १९४ धावांपर्यंत मजल मारुन दिली. कारण त्यावेळी लोकेश राहुल बाद झाला. राहुलने ५४ चेडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६९ धावा केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button