ताज्या घडामोडीमुंबई

जामिन मिळत नसल्याने माझ्याविरुद्ध षड्ंयत्र; वकील प्रवीण चव्हाणांचे प्रतिउत्तर

मुंबई |  विधानसभेत स्टिंग ऑपरेशनचा पेन ड्राईव्ह सादर करत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गिरीष महाराजांना खोट्या गुन्हा अडकवण्याचा खळबळजनक आरोप केले होते. या आरोपांवरुन प्रतिउत्तर देताना प्रवीण चव्हाण यांनी आज सांगितले की, हे स्टिंग ऑपरेशन बनावट असून यातील व्हिडिओ आणि आवाजामध्ये फेरफार केला आहे. तसेच या स्टिंग ऑपरेशनचे जळगावशी कनेक्शन आहे. माझ्या वकीलीमुळे अनेक आरोपींना जामिन मिळत नाही, अशा आरोपींमधील काहींनी माझ्याविरुद्ध स्टिंग ऑपरेशनचे षड्ंयत्र केले असावे.

पुढे प्रवीण चव्हाण म्हणाले की, माझ्या कार्यालयात नेहमी येणारा तेजस मोरे यांना आपल्या घडाळ्यात छुपा कॅमेरा लावून हे स्टिंग ऑपरेशन केले असावे. त्याचा जामीन अर्ज माझ्याकडे होता, त्यात त्याचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे, ते घड्याळ त्यानेच आणलेले होते. त्याने मला एसी बसवून देतो, असे मला सांगितले. मी त्याला नकार दिला होता. त्यानंतर त्याने स्मार्ट टीव्ही बसवतो, असे सांगितले. त्यालाही मी नकार दिला. कारण मी आजतागायत कोणाकडूनही भेटवस्तू स्विकारलेली नाही. त्याने मला विविध प्रकारे प्रलोभने दिली. मी प्रत्येक वेळी त्याला नकार दिला. त्याचा आणि त्याच्या पत्नीचा मी यापूर्वी अटकपूर्व जामीन मिळवून दिला होता. त्याची फी देखील अजून बाकी आहे. तो माझा आशील होता, तो जळगावचा होता. त्यामुळे त्याला हाताशी धरुन विरोधकांनी हे संपूर्ण षडयंत्र रचलेलं आहे. चौकशीत हे पूर्णपणे उघड होणार आहे. यामध्ये आणखी कोणकोणत्या व्यक्ती आहेत हे आज ना उद्या बाहेर येणार आहे. तेजस मोरेसोबत तुरुंगात असलेला चाचू नावाचा कैदी सकाळी इथे आला होता. जो सीसीटीव्हीमध्ये दिसून येतो. हा चाचू नावाचा व्यक्ती सध्या नांदेडमध्ये पळून गेला आहे. यामध्ये सर्व कायदेशीर बाजू तपासून मी गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील कारवाई करणार आहे. स्टिंग ऑपरेशनच्या क्लीपमध्ये मॅचिंग दिसून येत नाही. दुसरे म्हणजे यामध्ये जी वक्तव्य आहेत त्यात फेरफार केलेला आहे. यामध्ये आक्षेपार्ह असे कुठलेही वक्तव्य दिसत नाही. यामध्ये त्यांनी फेरफाराचा केविलवाना प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे दिसून येत.

आजच्या जगात व्हिडिओ आणि आवाजामध्ये फेरफार करता येतो. त्यांनी जो दावा केला आहे की, ऑफिसमध्ये हा प्रकार झालेला आहे. एक तर त्यांनी विनापरवानगी त्यांनी ऑफिसमध्ये येऊन गुन्हा केला आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये कटछाट केली आहे म्हणजेच त्यातील काही भाग लपवलेला दिसून येत आहे. यासंपूर्ण प्रकरणाची जेव्हा चौकशी होईल तेव्हा यातील सर्व सत्य बाहेर येईल, असा पुनरुच्चार सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी केला

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button