TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोठी बातमी: महापालिकेच्या ६८ शिक्षण सेवकांना ‘दिवाळी गिफ्ट’

  • महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा नियमितीकरणाचा निर्णय
  • भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

पिंपरी | पिंपरी- चिंचवड महापालिका अंतर्गत काम करणारे ६८ शिक्षण सेवक नियमित सेवेत घेण्यात येणार आहे. त्यामुळे ३ वर्षे सेवाकाळ पूर्ण केलेल्या शिक्षण सेवकांना आयुष्यभरासाठी “दिवाळी गिफ्ट” मिळाले आहे.

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शिक्षण सेवकांना न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. पिंपरी- चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत कार्यरत ७८ प्राथमिक शिक्षण सेवकांपैकी ६८ शिक्षण सेवकांचा तीन वर्षे कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण झालेला आहे. शासन निर्णयानुसार, केवळ ६ हजार रुपये तुटपुंज्या मानधनावर संबंधित शिक्षण सेवकांनी सेवा बजावली आहे. दि. १७ सप्टेंबर २०२२ अखेर बहुतेक सर्वच शिक्षण सेवकांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्याने आता त्यांना मिळणारे मानधनही बंद होणार आहे. त्यामुळे संबंधित शिक्षण सेवकांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शमनोज मराठे यांनी शिक्षण सेवकांना नियमिततेचे आदेश विनाविलंब मिळावेत यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला होता.

दरम्यान, दि.२७ सप्टेंबर २०२२ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील , उप आयुक्त श्री. खोत, प्रशासन अधिकारी श्री.नाईकडे यांची भेट घेऊन शिक्षण सेवकांना नियमित वेतन श्रेणीचे आदेश तातडीने मिळावेत. यासाठी चर्चा केली केली होती. आमदार लांडगे यांनी स्वतः पाठपुरावा करून संबंधित शिक्षण सेवकांची मागणी प्रशासनाकडे लावून धरली, अशी माहिती मनोज मराठे यांनी दिली.
**
प्रतिक्रिया

पदवीधर शिक्षक संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने शिक्षण सेवकांना दिवाळी पूर्व नियमिततेचे आदेश देण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे निश्चितच ६८ शिक्षण सेवकांची दिवाळी गोड होणार आहे.

  • मनोज मराठे,
    राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य पदवीधर’ प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा.

महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे- पाटील म्हणाले की, महापालिका शिक्षण विभाग अंतर्गत एकूण ७८ शिक्षण सेवकांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे त्यापैकी ६८ शिक्षकांच्या निर्मिती करण्याचे आदेश काढले असून, उर्वरित शिक्षण सेवक कागदोपत्री पूर्तता करून नियमित करण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button