breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL2020 : दिल्लीची बंगळुरूवर मात, मात्र दोन्ही संघ प्ले-ऑफमध्ये दाखल

अबुधाबी – अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर कालच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 6 विकेट्सने जोरदार विजय मिळवला. या विजयासह दिल्ली प्ले ऑफमध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरली आहे. तर पराभवानंतरही बंगळुरूनेदेखील प्ले ऑफमध्ये धडक दिली आहे. आता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा क्वालिफायर एकचा सामना ५ नोव्हेंबरला होईल.

काल झालेल्या सामन्याच्या सुरुवातीला दिल्लीने नाणेफेक जिंकून बंगळुरुला फलंदाजीसाठी भाग पाडले. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने 20 षटकांत 7 विकेट्स गमावून 152 धावा केल्या. बंगळुरुकडून सलामीवीर देवदत्त पड्डीकलने 41 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. तर मिस्टर 360 एबी डी व्हीलियर्सने 21 चेंडूत 35 धावांची तडाखेदार खेळी केली. कर्णधार विराट कोहलीने 24 चेंडूत 29 धावा केल्या. तसेच दिल्लीकडून एनरिच नोर्तजेने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कगिसो रबाडाने 2 विकेट्स मिळवल्या. तर रवीचंद्रन आश्विनने 1 बळी मिळवला.

त्यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या दिल्लीला 19 धावांवर पहिला धक्का बसला. पृथ्वी शॉ 9 धावांवर बाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात आला. शिखर आणि अजिंक्य या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 88 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान शिखरने अर्धशतक पूर्ण केले. मात्र यानंतर तो 54 धावांवर बाद झाला. शिखरने 41 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या.

शिखरनंतर कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात आला. मात्र त्याला मैदानात टिकता आले नाही. श्रेयसला शहबाज अहमदने 7 धावांवर बाद केले. यानंतर अजिंक्य रहाणेने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र लेग स्वीप मारण्याच्या नादात अजिंक्य बाद झाला. त्याने 46 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 60 धावा केल्या. यानंतर मैदानात असलेल्या ऋषभ पंत-मार्कस स्टोयनिसने दिल्लीला विजय मिळवून दिला. पंत 8 तर मार्कस 10 धावांवर नाबाद राहिले. दरम्यान, अजिंक्य रहाणेने या सामन्यात आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 28वे अर्धशतक 37 चेंडूत पूर्ण केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button