breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक आचारसंहिता जाहीर

पिंपरी / महाईन्यूज

पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आज सोमवारी (दि. 2) जाहीर झाली आहे. त्याची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या मोटारी जमा करण्यात आल्या आहेत. दालनावरील पाट्या झाकल्या जाणार आहेत.

राज्यातील पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघातही निवडणूक होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील पदाधिका-यांनी शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे.

महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, प्रभाग अध्यक्ष, विविध विषय समित्यांच्या सभापतींना शासकीय वाहने दिली जातात. या पदाधिका-यांना शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे. सध्या महापौर, उपमहापौर, महिला व बालकल्याण समिती सभापती शासकीय वाहन वापरतात. त्यांनी वाहने जमा केली आहेत. तर, बाकीचे पदाधिकारी स्वतःचे वाहन वापरत असून इंधन पालिकेकडून घेत आहेत. त्यांनी खासगी वाहनावरील सभापतीपदाचा बोर्ड झाकणे बंधनकारक आहे.

पालिकेतील दालनावरील पाट्या झाकल्या जाणार आहेत. कोरोनामुळे पाच महिने सभापतीपदाची निवडणूक झाली नव्हती. आठ दिवसांपूर्वी निवडणूक झाली होती. आठ दिवसांच्या आतच सभापतींना शासकीय वाहन सोडावे लागले आहे. 3 डिसेंबर 2020 पर्यंत आचारसंहिता आहे. महिनाभर पदाधिका-यांना वाहन वापरायला मिळणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button