breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये बंगलोरची मुंबईवर मात

शारजा – आयपीएलच्या तेराव्या हंगामात काल रंगलेल्या दहाव्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सवर थरारक विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळरू संघाने 20 षटकांत मुंबईच्या संघासमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला मुंबईचा संघदेखील 201 धावाच करू शकला. ज्यामुळे दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघाने केवळ 7 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करत बंगळरूच्या संघाने मुंबई इंडियन्सवर थरारक विजय मिळवला.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. 15व्या षटकापर्यंत आरसीबीच्या हातात असलेला सामना किरॉन पोलार्डने अलगद मुंबई इंडियन्सच्या बाजूने झुकवला. इशान किशनच्या परिपक्व खेळाला पोलार्डच्या अनुभवाची साथ मिळाली आणि मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर आली होती. अखेरच्या षटकापर्यंत सामन्यातील चुरस कायम होती. त्यातच पाचव्या चेंडूवर इशान किशनची पडलेली विकेट सामन्याला कलाटणी देते की काय असे वाटत होते, परंतु पोलार्डने अखेरच्या चेंडूवर चौकार फाटकावून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. त्यानंतर नवदीन सैनीने टिच्चून मारा करताना मुंबई इंडियन्सला 1 बाद 7 धावा करू दिल्या. त्यानंतर आरसीबीने बाजी मारली.

सामन्याच्या सुरुवातीला आरसीबीकडून आरोन फिंच आणि देवदत्त पडीक्कल यांनी सावध सुरुवात केली. नवव्या षठकात ट्रेंट बोल्टने आरसीबीला पहिला धक्का दिला. फिंचने 35 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 52 धावा केल्या. त्यानंतर चौदाव्या षटकात देवदत्त पडीक्कलने मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जेम्स पॅटिसन्स याला सलग दोन षटकार फाटकावून आरसीबीला शतकी पल्ला पार करून दिला. मग पडीक्कल 40 चेंडूंत 54 धावांवर माघारी परतला. त्यानंतर डिव्हिलियर्सने 24 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारासह नाबाद 55, तर शिवम दुबेने 10 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारासह नाबाद 27 धावा केल्या. आरसीबीने 20 षटकांत 3 बाद 201 धावांचा डोंगर उभा केला.

या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला पहिल्या दहा षटकांत 3 बाद 63 धावाच करता आल्या. हार्दिक पांड्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु ऍडम झम्पाने त्याला 15 धावांवर माघारी पाठवले. मुंबई इंडियन्सला अखेरच्या 5 षटकांत विजयासाठी 90 धावांची गरज होती. सतराव्या षटकात पवन नेगीने सीमारेषेवर पोलार्डचा झेल सोडला आणि तो आरसीबीलाला भारी पडेल असेच चिन्ह दिसू लागली होती. ऍडम झम्पाने टाकलेल्या अठराव्या षटकात पोलार्डने 4, 6, 6, 2, 6, 3 अशा 27 धावा चोपल्या. अखेरच्या चेंडूवर युजवेंद्र चहलने पोलार्डचा झेल सोडला.

दरम्यान, या सामन्यात विराट कोहली पाठोपाठ रोहित शर्माही फ्लॉप ठरला. त्यामुळे खराब कामगिरीनंतर ट्विटरवर दोन्ही फलंदाजांची खिल्ली उडविली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button