breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४,३०,८६१ वर

  • मुंबईत २,४०२, पुण्यात २,३९० नवे रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. शनिवारी आढळलेल्या 14 हजार 348 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 14 लाख 30 हजार 861 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 278 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 37 हजार 758 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 16 हजार 835 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 11 लाख 34 हजार 555 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 2 लाख 58 हजार 108 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 2 हजार 402 नवे रुग्ण आढळले, तर 46 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 12 हजार 462 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 060 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 1 हजार 634 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 1 लाख 73 हजार 670 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोनाच्या 2 हजार 390 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 63 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 91 हजार 638 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 6 हजार 750 इतका झाला आहे. तसेच शनिवारी आढळलेल्या 2 हजार 390 नव्या रुग्णांपैकी 1 हजार 055 रुग्ण पुणे शहरातील असून 598 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे पुणे शहराची एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 48 हजार 406 इतकी झाली आहे, तर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 79 हजार 936 वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button